मुंबई : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आहे. मागच्या वर्षी १४ जूनला सुशांतने राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवले होते. त्यानंतर आता सुशांतशी संबंधीत ड्रग्स प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वीच एनसीबीने सुशांतचा फ्लॅटमेट आणि मित्र सिद्धार्थ पिठानीला या ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. एवढेच नव्हे तर सुशांतच्या घरी काम करणार्या नीरज आणि केशव या दोन्ही नोकरांचीही चौकशी केली. दरम्यान या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला मुख्य आरोपी मानण्यात आले आहे आणि एनसीबीच्या चौकशीत रियाने सुशांतची बहीण आणि तिच्या नवर्याबाबत काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
एनसीबीच्या चौकशीत रियाने सुशांतसिंह राजपूत संबंधीत ड्रग्स प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासे केलेले आहेत. एवढंच नाही तर सुशांत त्याची बहीण आणि बहिणीच्या नवर्यासोबत ड्रग्स घेत असे असेही तिने म्हटले आहे. रिया चक्रवर्तीने लिहिले, मला हे सांगायचं आहे की, ज्या गोष्टींचा वर उल्लेख केलेला आहे, ते डॉक्टर निकिताचे प्रिस्क्रिप्शन आहे (रिया आणि शौविकचे मेसेज आणि प्रिस्क्रिप्शनची कॉपी) मी आणि शौविक गुगलच्या मदतीने क्लोमनेझेपानचे साइड इफेक्ट काय असतात याबाबत चर्चा करत होतो. डॉक्टरांशी बोलल्यानंतर त्यांनी ती औषध प्रिस्क्रिप्शननुसार सुशांतला देत राहण्याचा सल्ला दिला होता.
रिया चक्रवर्तीने आपल्या स्टेटमेंटमध्ये पुढे लिहिले, सुशांतची तब्येत दिवसेंदिवस बिघडत होती ज्यामुळे शौविकला चिंता वाटत होती. क्लोमनेझेपान आणि त्याचे साइड इफेक्ट यावर आम्ही चर्चा करत होतो. डॉक्टर निकिताशी चर्चा केल्यानंतर आम्हाला समजले की आम्हाला गुगल डॉक्टर व्हायला नको. ८ जून २0२0 रोजी सुशांतला त्याची बहीण प्रियांकाचा एक व्हॉट्सअँप मेसेज मिळाला होता. ज्यात ड्रग्स घेण्याबद्दल सांगण्यात आले होते. तिने कार्डिओलॉजिस्च डॉक्टर तरूण यांचे प्रिस्क्रिप्शन दिले होते. त्यांनी सुशांतला न भेटता किंवा न तपासताच ओपीडी रुग्ण असल्याचे निदान केले होते. याचा अर्थ सुशांतला लगेचच रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती आणि ही औषधं सायकॅट्रीस्टच्या सल्ल्याशिवाय दिली जात नाहीत.
आपल्या स्टेटमध्ये रियाने म्हटले, मी निवेदन करते की, सुशांतची बहीण मितू ज्यावेळी त्याच्यासोबत ८ ते १२ जून या काळात राहत होती त्यावेळीचे त्याचा ड्रग्समुळे मृत्यू झाला असता. मी मुंबई पोलिसांना याची कल्पना दिली होती. सुशांत माझ्या संमतीशिवायच मरिजुनाचे सेवन करत होता. आम्ही दोघे भेटण्याच्या आधीपासूनच तो याचे सेवन करत होता. मी त्याला मरिजुना द्यावे किंवा मला ते ऑफर करण्यासाठी तो माझ्याकडे येत असे. रियाने पुढे लिहिले, मी सुशांतला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. ज्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. पण त्याची याला परवानगी नव्हती. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले नाही. सुशांतला मरिजुनाचे व्यसन लागले आहे हे त्याच्या कुटुंबीयांना चांगल्याप्रकारे माहीत होते.
एवढंच नाही तर सुशांतची बहीण प्रियांका आणि तिचा नवरा सिद्धार्थही मरिजुनाचं सेवन करत असत आणि सुशांतलाही आणून देत असत. हे विधान करताना आता मला कोणाच्याही धमकीची भीती वाटत नाही.
सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने केले धक्कादायक खुलासे..!
Contents hide