सरकारी कर्मचार्‍यांना केंद्राचा दिलासा

नवी दिल्ली : कोरोना संकटात भारत सरकारच्या पर्सनल मिनिस्ट्रीने कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यामुळे देखभाल आणि क्वारंटाईन पिरिएड आदींशी संबंधित सुट्ट्यांची अनेकांकडून माहिती मिळविली होती. यानंतर मंत्रालयाने यासंबंधी विस्तृत आदेश काढला आहे.
केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचार्‍यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. घरातील सदस्याला कोरोनाची लागण झाली असल्यास त्याची देखभाल करण्यासाठी कर्मचार्‍याला स्पेशल कॅज्युअल लिव्ह देण्याची घोषणा केली आहे. जर केंद्र सरकारच्या कोणत्याही कर्मचार्‍याचे पालक किंवा कुटुंबीयाला कोरोना झाल्यास १५ दिवसांची ही सुटी दिली जाणार आहे. पर्सनल मिनिस्ट्रीने याबाबतचा आदेश काढला आहे.
या आदेशामध्ये असे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कोणत्याही कर्मचार्‍याच्या नातेवाईकाला कोरोनाची बाधा झाली आणि त्याला जर हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज भासली तर १५ दिवसांच्या स्पेशल लिव्हनंतर त्यांना कोणत्याही प्रकारची आणखी सुट्टी मिळू शकते. हॉस्पिटलमधून कुटुंबीय डिस्चार्ज होण्यापयर्ंत ते ही सुट्टी घेऊ शकतात.
कोरोना संकटात भारत सरकारच्या पर्सनल मिनिस्ट्रीने कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यामुळे देखभाल आणि क्वारंटाईन पिरिएड आदींशी संबंधित सुट्ट्यांची अनेकांकडून माहिती मिळविली होती. यानंतर मंत्रालयाने यासंबंधी विस्तृत आदेश काढला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!