समता सैनिक दलाची संरक्षण फळी संघर्षासाठी तयार

वर्धा : स्थानिक समता नगर येथील गट शिक्षण विस्तार अधिकारी रुपेश कांबळे यांच्या घरी संपन्न झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध पक्ष आणि संघटनांच्या ७0 कार्यकर्त्यांनी समता सैनिक दल या सामाजिक संघटनेत जाहीर प्रवेश केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दल जिल्हा संघटक अभय कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सुरक्षा विभाग प्रमुख प्रदीप कांबळे, आँल इंडिया पँथर जिल्हाध्यक्ष पंकज भगत,भिम टायगर सेनेचे जिल्हा संघटक आशिष जांभुळकर,सामाजिक कार्यकर्ते राजकुमार मेर्शाम हिगणघाट प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. त्यात प्रामुख्याने समाजात कुठेही अन्याय-अत्याचार झाल्यास सुरक्षा विभागाची चमू त्याठिकाणी तत्काळ जाऊन अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करेल.
आंबेडकरी समाजाला गटागटात विभागणार्‍या विघातक प्रवृतीशी लढा देणे आणि वेळप्रसंगी त्यांना चोप देऊन त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे. समाजा-समाजात तेढ निर्माण करणार्‍या, विषमतेचे सर्मथन करणार्‍या शत्रूशी मुकाबला करणे. समाजातील विविध संस्था आणि संघटना यांना एका सुत्रात बांधण्याचा प्रयत्न करणे. असे विविध ठराव पारित करून त्यावर तत्काळ कृती करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शेवटी सर्वांना आंबेडकरी समाजाचा निळा ध्वज खांद्यावर वाहून नेण्यासाठी कटिबद्ध असण्याची शपथ देण्यात आली.
यावेळी अभय कुंभारे, प्रदीप कांबळे, अजय कांबळे, धम्मपाल तेलंग, शहारे, धर्मपाल ढोबळे, आशिष जांभुळकर, रोशन कांबळे,अमोल ताकसांडे, पी.पटेल प्रशांत मेर्शाम,अमोल वंजारी,पंकज भगत, दिपक हुके, राजकुमार मेर्शाम,पवन थुल,चंदु भगत, आशिष खवले, विशाल खोब्रागडे,विशाल उके, आकाश कांबळे, जितेंद्र बन्सोड, मोहसिम शेख, बंडू टेभुर्णे,देवानंद कोल्हेकर, वैभव चकोले,प्रफुल मेर्शाम, विक्की वागदे,अनुप गोडघाटे, नरेंद्र शेळके, प्रकाश वाघमारे,फहिम काजी, सौरभ चचाणे, महेश शेगोकर,सारांश दबडे,अमन सोनपितळे, रजत दबडे, सम्यक नरांजे,अमन वाघमारे, विक्की वाघमारे, स्वप्निल ताकसांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!