• Wed. Sep 27th, 2023

शेतकर्‍यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

मुंबई : पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने तीन लाखांपयर्ंत कर्ज मिळणार आहे. यासंदर्भात गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकर्‍यांना तीन लाखांपयर्ंतचे पीक कर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे पीक कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या राज्यातील शेतकर्‍यांना तीन लाख रुपयांपयर्ंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. या निर्णयासंदर्भात बोलताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, १ ते ३ लाखापयर्ंत पीक कर्ज घेणार्‍या आणि ते नियमित फेडणार्‍या शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. यापूर्वी १ लाखापयर्ंत बिनव्याजी कर्ज मिळत होते. त्यावर तीन लाखापयर्ंत कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना ३ टक्के व्याज भरावे लागत होते. आता ३ लाखापयर्ंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे, असे ते म्हणाले. राज्यातील ४५ लाख शेतकरी याचा फायदा घेऊ शकतात. यंदा सरकारने ६0 हजार कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असेही ते म्हणाले.
मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, पीक कर्जावर व्याज देताना अनेकदा शेतकर्‍यांची अडचण होते. शेतकर्‍यांना व्याजाच्या बोजापासून मुक्त करण्याचे उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यांना कर्ज थकबाकी होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने तीन लाख रुपयांपयर्ंत पीक कर्ज घेणार्‍्या शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याज कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. पीक कर्जावरील व्याजाची रक्कम सरकार देईल. आवश्यक निधी शासनाकडून पुरविला जाईल, असे अजित पवार त्यावेळी म्हणाले होते.
या निर्णयामुळे राज्य शासन देत असलेली व्याज दर सवलत तीन टक्के व केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळाल्याने शेतकर्‍यांना सदर पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीक कजार्ची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. योजनेत विहित मुदतीत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना १ लाख रुपये कर्ज र्मयादेपयर्ंत ३ टक्के व्याज सवलत १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज मयार्देपयर्ंत १ टक्का व्याज दरात सवलत देण्यात येत होती, आता १ लाख ते ३ लाख रुपये या कर्ज र्मयादेमध्ये शेतकर्‍यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना अधिक २ टक्के व्याज दरात सवलत देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.
आता सन २0२१-२२ पासून शेतकर्‍यांना ३ लाख रुपये कर्ज र्मयादेपयर्ंत अल्पमुदत्तीच्या कजार्ची परतफेड विहित मुदतीमध्ये केल्यास त्यांना एकूण ६ टक्के व्याज सवलत मिळून अंतिमत: त्यांना सदरचे पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. यामुळे कृषी उत्पन्न वाढीसाठी शेतकर्‍यांना आधुनिक कृषि निविष्ठा जसे बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कजार्ची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,