अमरावती : यंदाच्या शैक्षणिक वषार्साठी शाळांनी पालक- शिक्षक संघामार्फत व पालकांना विश्वासात घेऊन शुल्क निश्चित करावे, तसेच अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिका-यांनी खासगी शाळांच्या प्रशासनाला दिले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी ई. झेड खान व माध्यमिक शिक्षणाधिकारी तेजराव काळे यांनी खासगी शाळांना पाठविलेल्या पत्रात नमूद आहे की, कोविड स्थितीची पार्श्वभूमी व संचारबंदी लक्षात घेऊन चालू शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २0११ चे काटेकोर पालन आवश्यक आहे. पालकांना विश्वासात घेऊन शिक्षण शुल्क निश्चित करावे.
प्रवेश परीक्षा नको आणि डोनेशनही
विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत पालक किंवा विद्यार्थ्यांची तोंडी किंवा लेखी परीक्षा घेऊ नये. प्रवेश देताना कोणतीही देणगी घेऊ नये, असे स्पष्ट बजावण्यात आले आहे. पुनप्र्रवेश घेऊ नये. शैक्षणिक शुल्काबाबत सवलत किंवा मुदतवाढ द्यावी, असेही नमूद आहे.
शाळांनी बूट, मोजे, गणवेश विकू नका
शाळांनी वह्या, पुस्तके, बूट, गणवेश आदी साहित्याची विक्री करू नये किंवा विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती करू नये. चालू वर्षी गणवेश बदलू नका, असेही आदेश आहेत.
तक्रार आली तर मान्यता काढू
महामारीच्या या काळात शाळांकडून विद्यार्थी किंवा पालकांची अडवणूक होत असल्याची तक्रार आल्यास शाळेची मान्यता रद्द करणे, संलग्नता प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल, याची सर्व शाळांनी नोंद घेण्याचा इशारा शिक्षणाधिका-यांनी दिला आहे.
शाळांनी अतिरिक्त शुल्क आकारू नये शिक्षणाधिकार्यांकडून शाळांना पत्र
Contents hide