नागपूर : यावर्षी मान्सून विदर्भात अगदी वेळेवर दाखल झाला असून सर्वच जिल्ह्य़ात पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे मात्र नागरिकांची त्रेधातिरपट उडाली. काही जिल्ह्य़ात झाडे कोसळून वाहतूक अडली तर झाडे वीज तारांवर कोसळून वीजपुरवठा खंडित झाला. भंडारा जिल्ह्य़ात वीज कोसळून तीन ठार तर दोनजण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दुसरीकडे बळीराजा सुखावला असून पेरणीसाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत
मागील २४ तासांमध्ये विदर्भातही सर्वच जिल्हय़ांमध्ये पावसाने जोरदार धडक दिली आहे. रविवारी काही ठिकाणी उघाड तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. पावसाने उघाड दिल्याने शेतकरी जोमाने कामालाही लागला आहे. येत्या तीन दिवसात नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नागपूर शहरात ९६ मिमी पावसाची नोंद
पावसाच्या संततधारमुळे नागपूर शहराच्या तापमानातही घट नोंदविली गेली आहे. शनिवारी पहाटेच्यावेळी जोरदार पाऊस झाला होता. दिवसभरदेखील पावसाचेच वातावरण होते. शहराच्या तापमानात १.७ अंश सेल्सिअस एवढी घट झाली आहे. गत तीन दिवसातच नागपूर शहरात ९६ मिमी पावसाची नोंद झाली. शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. शनिवारी सकाळी ८.३0 वाजेपयर्ंत ६४.४ मिमी पावसाची नोंद झाली.
अमरावती जिल्ह्य़ात दमदार हजेरी
जिल्ह्य़ात ८ जूनला मान्सूनचे आगमन होताच जिल्ह्य़ातील १४ ही तालुक्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. नागरिकांसह शेतकर्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे धामनगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, चांदूर बाजार, दर्यापूर, मोर्शी याठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला असून पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
विदर्भाला दमदार पावसाची प्रतीक्षा
Contents hide