• Wed. Jun 7th, 2023

लस घेतल्यानंतर नाशिक येथील व्यक्तीच्या शरीराला चिकटतात लोखंडी वस्तू..!

नाशिक : कोरोनाच्या लसीबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होत असताना आता नाशिकच्या एका जेष्ट नागरिकाने कोरोनाची दुसरी लस घेतल्या नंतर त्यांच्या शरीराला लोखंडी वस्तू चिटकू लागल्या आहेत. या घटनेची नाशिकमध्ये चर्चा होत असून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
नाशिकमध्ये कोरोनाची लाट कमी होत असताना शासन पातळीवर लसीकरण जोरात सुरू आहे. मात्र, लसीकरणा नंतर सिडको भागातील अरविंद सोनार यांच्या शरीरात वेगळे बदल झाले आहेत. सोनार यांनी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्याचे शरीर लोहचुंबक झाले आहे. त्यांच्या शरीराला लोखंडी आणि स्टीलच्या वस्तू चिटकू लागल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त होत आहे. मात्र, या विषयावर संशोधन करावे लागेल, असे डॉक्टरांनी सोनार यांना सांगितले आहे.
मी दोन दिवसांपूर्वी ८४ दिवसांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची दुसरी लस घेतली. लस घेतल्यानतंर मला कुठलाच त्रास जाणवला नाही. माझ्या मुलाने मोबाईलवर लसीबाबत दिल्ली येथील एक बातमी बघितली. त्यात लस घेतल्यानतंर शरीराला लोखंडी वस्तू चिटकतात, असे त्याने मला सांगितल्यावर मी देखील प्रयोग करून बघितला. आणि आश्‍चर्य म्हणजे माझ्या हाताच्या दंडाला, छातील कॉईन, चमचा, उचटनी चिटकू लागले. सुरवातीला मला वाटले घामामुळे वस्तू चिटकत असतील, मग मी आंघोळ केली, मात्र तरी देखील वस्तू चिटकत आहे. माझे १0 वर्षांपूर्वी बायपासचे ऑपरेशन झाले. मात्र, आता पर्यंत कधीच असे झाले नाही, असे अरविंद सोनार यांनी म्हटले.
माझ्या आई आणि वडिलांनी दोघांनीही कोविशिल्डची दुसरी लस घेतली. मी एक व्हिडीओ बघितला होता, त्यात लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या शरीराला लोखंडी वस्तू चिटकत होत्या. मी गंमत म्हणून वडिलांना सांगितले की, तुम्हीसुद्धा लोखंडी वस्तू तुमच्या हाताच्या दंडाला लावून बघा. वडिलांनी देखील गंमत म्हणून लावून बघितले तर आश्‍चर्य असे की, त्यांच्या हाताला आणि छातीला लोखंडी वस्तू चिटकू लागल्या, चमचा, कॉईन, उचटणी अशा वस्तू चिटकू लागल्याने आम्हाला देखील आश्‍चर्य वाटले, मात्र आईच्या बाबतीत, असे झाले नाही, असे अरविंद सोनार यांच्या मुलाने सागितले. कोरोनाची लस घेतली आणि शरीर चुंबकीय झाले, असे कधी ऐकले नाही. मात्र, याचे संशोधन करावे लागेल, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *