सांगली : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणार्या १0८ वर्षीय आजीबाईंची सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी भेट घेतली आणि त्यांचा साडीचोळी देऊन सत्कारही केला. कोरोनाचा कहर सुरू असताना आजीबाईंनी सर्व काळजी घेत स्वत:ला कोरोनाची लागण होऊ दिली नाही, त्याचबरोबर लसींचे दोन्ही डोस घेत सामाजिक संदेश दिल्याची भावना पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सांगली जिल्हय़ातल्या इस्लामपूर इथल्या १0८ वर्षीय जरीना आजी यांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतले. त्यामुळे जिल्हय़ाचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. मंत्री जयंत पाटील हे आपल्या मतदारसंघात बरेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरीना आजीने ‘लवकर आलास’ अशी हाक देत मायेने विचारपूसही केली.
जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस पूर्ण करुन लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे दाखवून दिले. त्यामुळे लसीकरण हेच करोनावरील प्रभावी शस्त्र असल्याने प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावे असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
लसीचे दोन्ही डोस घेणार्या १0८ वर्षांच्या आजीचा सत्कार
Contents hide