• Wed. Jun 7th, 2023

रोगनिदान आवाजातील बदलांवरून..

शरीरयंत्रणेतील काही बिघाड अनारोग्याचे निदर्शक असतात. शरीराला एखाद्या व्याधीने ग्रासल्यास लगेचच अथवा काही काळाने शारीरिक लक्षणं दिसू लागतात. मात्र काही लक्षणं दिसत नसली तरी अनेक आजार सुप्तावस्थेतच राहतात हेदेखील आपण समजून घ्यायला हवं. अशा प्रकारे एकीकडे आपण गाफिल असतो तर दुसरीकडे शरीर व्याधीग्रस्त होत असतं. ही स्थती टाळण्यासाठी संशोधक विविध आजारांचं वेळेत निदान करणार्‍या पद्धती शोधून काढण्यात व्यग्र असलेले पहायला मिळतात.
याचाच एक भाग म्हणून अमेरिकेतील संशोधकांच्या एका गटाने आवाजाच्या सहाय्याने मेंदूतील विकारांचं निदान करणारं उपकरण शोधून काढलं आहे. मेंदूतील काही विकार क्रॉनिक अवस्थेत पोहचल्यानंतरच समोर येतात. त्यामुळे रुग्णाला उपचार घेण्याची संधीच मिळत नाही. मात्र या उपकरणाच्या सहाय्याने आजार प्राथमिक अवस्थेतच समजतात आणि उपचारांती रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते. सध्या हे उपकरण चाचणी प्रक्रियेतून जात आहे. व्हॉईस अँनॅलसीस करणारं हे मशीन तज्ज्ञ आणि रुग्ण यांच्यामधील संवादाचा अभ्यास करतं. त्यासाठी मशीनमध्ये लर्निंग सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. या नव्या संवादाची आधीच्या डेटाबेसशी पडताळणी केली जाते. रुग्णाचा इमोशनल इंटेलजन्सही लक्षात घेतला जातो. ही माहिती सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये संकलत केली जाते आणि त्यावरुन अनुमान काढलं जातं. ‘केनिरी स्पीच’ असं या उपकरणाचं नाव आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *