अमरावती : जिल्हयात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा कमी झाला असुन कोरोना रुग्णांची संख्या देखिल मंदावली आहे. त्यामुळे जिल्हयात सध्यातरी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. १३ जुन रोजी जिल्हयात १0१ रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले असुन आतापर्यत जिल्हयात ९५ हजार ६0 रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहे. ९१ हजार ७२२ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असुन १ हजार ८१३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिवसभरात एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असुन आतापर्यत १ हजार ५२५ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहे.जिल्हयात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९६.४९ इतका असुन मृत्यू दर हा १.६0 वर पोहोचला आहे.
जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी प्रशासनाने जनतेला गाफिल न राहता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. याच पश्वभुमिवर महानगर पालिका प्रशासनाकडून अदयापही चौका चौकामध्ये विनाकारण फिरणार्या नागरिकांची कोरोनाचाचणी करण्याची मोहीम सुरूच आहे. त्यामुळे रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट नियंत्रणात असल्याचे दिसुन येत आहे.कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे बाजारपेठामध्ये मोठया प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे अनेक ठिकाणी सर्रास उल्लंधन होत असतांना दिसुन येत आहे. मात्र रुग्णांची संख्या मदावल्यामुळे नागरिक देखिल नियमांकडे दुर्लेक्ष करीत असल्याचे दिसत आहे. शहरीसह ग्रामिण भागात कोरोना प्रतिबंधात्मक नियमाकडे मोठया प्रमाणात दुर्लेक्ष होत असल्यामुळे कोरोनाचा संभाव्य धोका ग्रामिण भागात अधिक दिसुन येत आहे.१३ जुन रोजी जिल्हयात १0१ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असुन जिल्हयात आतापर्यत ९५ हजार ६0 कोरोनाग्रस्त आढळून आले आहे.१ हजार ८१३ रुग्ण हे रुग्णालयात दाखल असुन एका रुग्णाचा मृत्यू झाला असुन आतापर्यत जिल्यात १ हजार ५२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रुग्ण संख्येत घट, मात्र संभाव्य धोका कायम
Contents hide