नागपूर : माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे तत्कालीन विशेष कार्यकारी अधिकारी राम खांडेकर यांचे मंगळवारी रात्री उशिरा नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा मुकुल, सून संगीता, दोन नातवंडे गौरांग आणि जान्हवी तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने निस्पृह आणि कर्तव्यदक्ष असे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
राम खांडेकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणून देखील जबाबदारी सांभाळजी होती.पी. व्ही. नरसिंहराव यांनी राम खांडेकर यांना १९८५ मध्ये रामटेक मतदार संघाच्या व्यवस्थापनासाठी बोलवले होते. १९९१ मध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाले. नंतर खांडेकर हे त्यांचे ओएसडी म्हणून नियुक्त झाले. खांडेकर यांनी नरसिंह राव यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्यासोबत काम केले. विविध राजकीय नेत्यांबरोबरचे त्यांचा संवाद होता. २0१८ मध्ये त्यांनी पाच दशकांहून अधिक सार्वजनिक जीवनातील विस्तीर्ण अनुभवाच्या आधारे साप्ताहिक स्तंभ लिहिले. राजहंस पब्लिकेशनच्या ‘सत्तेच्या पडछायेत’ या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाले होते. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
राम खांडेकर यांचे निधन
Contents hide