• Mon. Sep 25th, 2023

राज्य सरकार मराठय़ांच्या बाजूने-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : संघर्ष करत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तो खरा नेता असतो. फक्त आदळआपट करणे याला मी नेतृत्व म्हणत नाही. समोर मिळतेय ते सुद्धा आदळआपट करुन तोडून टाकणे, हे नेतृत्वाचे लक्षण नाही. संघर्षाच्या वेळी जरुर संघर्ष केला पाहिजे. पण, जेव्हा आपल्या लक्षात येते की सगळे एकमताचे आहेत तेव्हा तिथे संघर्ष थांबवून संवाद सुरू केला पाहिजे. तो संवाद संभाजीराजेंनी सुरू केला. पण अनेकजण अजूनही आदळआपट करतात, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंचे कौतुक केले आहे. तर, अप्रत्यक्षरित्या भाजपच्या चक्काजाम आंदोलनावर टीका केली आहे. राज्य सरकार मराठय़ांच्या बाजूने असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कोल्हापुरात सारथी संस्थेच्या उपकेंद्राचा शुभारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत आपण बैठक घेतली. न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरणं हे आमच्या धमन्यात भिनलं आहे. पण, संघर्ष करत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचे हे ज्याला कळते तोच खरा नेता असतो, असे म्हणत संभाजीराजेंना धन्यवाद म्हटले आहे. संघर्ष आणि संवाद यांच्यात तारतम्य हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.संभाजीराजेंचे नेहमी मी कौतुक करत असतो. त्यामुळे अनेकांना असे वाटते आम्ही संभाजीराजेंना पटवले आहे. पण संभांजी राजे काही पटणारा माणूस नाहीयेत. ते योग्य तेच बोलणार. साधारणत: भावना, मतं, आणि स्वभाव जुळतात आणि हेतू साफ आणि स्पष्ट असतात तेव्हा हे ऋुणानुबंध जुळतात. ओढून ताणून जे होते त्याला नाते नाही बोलता येत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मराठा समाजाकरिताच्या त्या मागण्या आहेत. पण मराठा समाज खूप सामजंस्यांनी समजून घेतो आहे., असे ते म्हणाले. संघर्ष कोणासोबत करायचा. पण सरकार ऐकते आहे. काही ठिकाणी कायद्याच्या अडथळे आहेत. ते अडथळे आपल्याला कायद्याच्या मार्गाने पार करावे लागणार आहेत. पण ते अडथळे बाजुला ठेवून. ज्या काही गोष्टी करायच्या आहेत. सध्या देशावर व महाराष्ट्रावर आर्थिक संकट घोंगावतय. समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरायचे. मोठय़ा प्रमाणात त्याला एकत्र करायचे आणि न्यायहक्कासाठी लढा द्यायचा आणि घरी जातानं कोरोनाचे संकट न्यायचे हे काही नेतृत्वाचा लक्षणे नाही. खरा नेता तोच आहे तो समाजाचे रक्षण चहूबाजूने करतो. गर्दी केली ताकद दाखवली नंतर साथ पसरली. हे बरोबर नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मराठा आंदोलनही वणव्या सारखे भडकले असते पण संभाजीराजेंनी योग्य विचार केला, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीने वचन देतो, की या माझ्या समाजासाठी जे-जे काही करणे शक्य असेल, तिथे कुठेही आपले सरकार मागे राहणार नाही. तुमच्यासोबत खांद्याला-खांदा लावून, प्रत्येक पावली तुमच्यासोबत राहील. जसा हा माझा मराठा समाज आहे, तसाच हा माझा ओबीसी समाज आहे. ज्याप्रमाणे शाहू महाराजांनी दिनदुबळ्याना एक ताकद दिली. ती ताकद देण्याची परंपरा हे सरकार पुढे नेत आहे. जिथे जे काही करणे आवश्यक आहे. ते करत-करत पुढे जाऊ या, असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,