• Mon. May 29th, 2023

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस

मुंबई : मागील तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड आणि र%ागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ५ जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यापासून अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात रायगड, र%ागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तर मान्सूनने पार झोडपून काढले आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी अतवृष्टी होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी मांडले आहे.
भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी संवाद साधला आहे. यामुळे त्यांनी मान्सून पावसात झालेल्या अनेक बदलांवर प्रकाश टाकला आहे. तसेच राज्यात अतवृष्टीचे प्रमाण का वाढले आहे? याचंही उत्तर त्यांनी दिले आहे. खरंतर, सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मागील तीन दिवस मुंबईसह ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, र%ागिरी, रायगडमध्ये मुसळधार पाऊस झाला. तर काही ठिकाणी अतवृष्टीही झाली. तर काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकणात अतवृष्टी झाल्याची माहितीही होसाळीकर यांनी दिली आहे.
दरवर्षीचा मान्सून हा आधीच्या मान्सूनपेक्षा काहीतरी वेगळा असतो. त्यामध्ये अनेक छोटे-मोठे बदल झालेले असतात. दरवर्षी जूनमध्ये इतका जास्त पाऊस होते नाही. मात्र यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
राज्यातील पावसाच्या संतुलनाबाबत माहिती देताना होसाळीकर यांनी सांगितले की, अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात काही बदल झाले की राज्यात पाऊस पडतो. अरबी समुद्रातील शाखा सक्रिय झाली की, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पाऊस पडतो. तर बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय झाली की विदर्भात पाऊस पडतो. अरबी समुद्रात पश्‍चिमेकडून येणार्‍या वार्‍याची तीव्रता, वेग वाढली की आद्रता वाढते. त्यामुळे मान्सून सक्रिय होतो.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *