मुंबई:राज्यातील इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता गुण देण्याचे सूत्र शिक्षण विभागाने निश्चित केले आहे. १0 वी, ११ वी आणि १२ वीच्या अंतर्गत परीक्षा व प्रॅक्टिकलच्या आधारे हे गुण दिले जाणार असून त्यासाठी २0: ४0: ४0 असा फॉम्र्युला निश्चित केल्याची माहिती आहे. कोरोनामुळे राज्यात यंदाच्या शैक्षणिक सत्रात परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. १0 वी इयत्ता १२ वीच्या परीक्षा महाराष्ट्राने रद्द केल्याची घोषणा ३ जून रोजी केली होती.
त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याबाबतचे सूत्र निश्चित करण्यास अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यावर तज्ज्ञांच्या अनेक बैठका होऊन फॉर्म्युला निश्चित झाल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. इयत्ता १0 वीचे २0 टक्के गुण, इयत्ता १२ वीचे ४0 टक्के गुण आणि इयत्ता १२ मधील अंतर्गत परीक्षा व प्रॅक्टिकल असे ४0 टक्के गुण विचार घेतले जाणार आहेत.
या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ निकाल जाहीर करेल. यासंदर्भातली शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसांत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अंतिम निर्णय जाहीर करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्यात यंदा १२ वीचे १४ लाख विद्यार्थी आहेत. इयत्ता १0 वी परीक्षा यंदा झालेली नाही. मात्र ११ वी प्रवेशासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाणार आहे. त्या परीक्षेसंदर्भात राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करते आहे. त्याची माहिती आठवड्यात जाहीर केली जाणार आहे.
राज्यातही बारावीसाठी २0:४0:४0 फॉर्म्यूला?
Contents hide