• Tue. Sep 26th, 2023

या आयुष्यावर बोलू काही

*आयुष्य म्हणजे काय?*
*बघीतले तर सोपं असतं*
*जगायला गेलं तर,*
*दु:खातही सुख मिळतं*
आयुष्यातील एक सत्य, खरं वेळ एखाद्या वाहत्या नदी सारखे
असते. जसे एकदा नदीतील पाण्याला स्पर्श केला तर त्याच पाण्याला आपण पुन्हा स्पर्श करु शकत नाही. कारण नदीच्या
प्रवाहा बरोबर गेलेले पाणी कधी परत येत नाही. तसेच वेळेचे पण आहे. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण
महत्वाचा असतो.क्षणा क्षणाचा आनंद लुटावा…
*आयुष्य म्हणजे संघर्ष*
*संघर्षातून मार्ग काढणे*
*हेच खरे आयुष्य असते*
तुम्ही आयुष्यात काय आणि किती कमावले यावर कधी गर्व करु नये. कोणासाठी काय करु
शकतो ,हेच ध्येय असावे.कारण बुध्दी बळाचा खेळ संपला
की सगळेच मोहरे,राजा, प्रधान, एकाच डब्यात ठेवले जातात…
आयुष्याचा मोह नसावा ते थोडे असले तरी चालेल पण प्रेम, ओढ आपुलकी,जिव्हाळा , असावा. मैत्री करावी ती
निखळ, निस्वार्थ, ओंजळ कमी पडावी अशी मैत्री असावी…
*भुक असेल तेवढे खाणे, ही प्रकृती*
*भुके पेक्षा जास्त खाणे ही विकृती*
*वेळ प्रसंगी उपाशी राहून, भुकेलेल्या*
*खाऊ घालणे ही आहे संस्कृती*
आयुष्य जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू आपल्याला सतत जिंकायची सवयच आहे.
हाराल तेव्हा असे हारा की सतत जिंकून जिंकून वैताग आलाय
म्हणून हारायचे आहे….
चांगली वस्तु असो किंवा चांगली माणसे ओळखता आली पाहिजे.नाही तर त्याची किंमत ती आयुष्यातून निघून गेल्यावर
कळते.आयुष्यात फक्त दोन गोड
शब्द म्हणजे खरा श्रीमंत होय..
*आयुष्य असे जगावे*
*की मृत्युला ही लाज वाटावी*
*त्याने म्हणावे की जगून घे*
*मी परत कधी येईन*
हर्षा वाघमारे
नागपूर ✍️

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,