मी लिहीणार आहे !

माझी कविता कुणाला आवडो नावडो

तरीही मी लेखनी माझी झिजविणार आहे
नव रोपट्यांना मी जपणार आहे
मनात उठणारे अगणित प्रश्न
मी वाचकांच्या पुढ्यात ठेवणार आहे .
ज्यांचे प्रश्न त्या कानापर्यंत पोहचत नाही
तोपर्यंत शब्दांना स्वस्थ बसू देणार नाही
अव्याहत मी खर्डे घासणार आहे .
खोकल्या व्यवस्थेशी थोडा भांडणार आहे
माझ्या कवितेला नकोत
कुणाचे पुरस्कार नि बक्षीसी
फक्त दाबलेला आवाज बुलंद करून
चारचौघापर्यंत पोहचाविणार आहे .
समाजाप्रती माझं उत्तरदायीत्व समजून
मी लिहीत राहणार आहे
आक्रोश वंचितांचा शब्दबद्ध करणार आहे .
जागृतीचा वणवा थोडासा पेटविणार आहे
न्याय मिळो न मिळो त्यांना
किमान गल्लीतील आवाज
दिल्लीच्या दिशेने पोहोचविणार आहे .
यासाठीच लोकहो मी लिहीणार आहे .
अरुण विघ्ने