• Mon. Jun 5th, 2023

मी बाल कामगार बोलतोय !

बालपण आमच हरवलं !
घरकामात, शेतीत, गुर वळण्यात !
हाॅटेलात, भिक मागण्यात, चिखल मळण्यात !!
आमचे चिमुकले हात राबतात –
पेपर वाटण्यात, कोळसा खाणीत, बूट पाॅलिशसाठी
तुमच्या महागड्या गाड्या पुसण्यासाठी
भंगार कचरा वेचण्यासाठी
कामात जुंपल जात घाण्याच्या बैलागत
व्यक्तिमत्व आमचं गोठलं ध्रुवीय बर्फागत
पण-
व्यथा आमच्या जीवाच्या
कुणा कळणार कशा?
आगपेटी कारखान्यात जळतोय आम्ही !
काच बनविताना तडकतो आम्ही !!
तयार करता करता फटाके !
आयुष्याची झाली स्फोटके !!
विटभट्टीवर बालपण कोरपलं !
भंगार वेचत आयुष्य भंगार झालं !!
आम्ही घडवितो शाळेच्या पाट्या
पण अक्षर नाही कळत !
पुरते पशु बनलो
ढोरामागे पळत !!
कुस्करल्या जातात कोवळ्या कळ्या
धुणीभांडी करताना !
अपंगत्व लादल जात
भिक्षेसाठी फिरताना !!
हिर्यांना पैलू पाडणारे आम्ही
आमच्या पैलुचे काय ?
ढोर मेहनत आमची
दुसरेच खाती साय !
अन्यायग्रस्त जगनं आमचं
कधी मिळेल न्याय ? !!
– प्रा. रमेश वरघट
करजगांव ता. दारव्हा जि. यवतमाळ

(Images Credit : Pudhari)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *