चांदूर रेल्वे : चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालखेड (रेल्वे) येथे महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाला विक्री करणार.्याच्या पानठेल्यावर तसेच घरी धाड टाकून ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात रविवारी सायंकाळी ५.३0 वाजता केली. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष शंकरराव डकरे (४९) रा. मालखेड हे गावातील पानठेल्यावर गुटखा विक्री करीत असल्याची गुप्त माहिती चांदूर रेल्वे पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रथम पानठेल्यावर धाड टाकली असता गुटखा, तंबाखू व पान मसाला असा एकुण ५ हजार ९९२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यानंतर सदर आरोपीच्या घरी झाडाझडती घेतली असता घरातून २७ हजार ९५८ रुपए असा एकुण ३३ हजार ९५0 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सुभाष डकरे यांना ताब्यात घेतले होते. आरोपीविरूध्द भादंवी कलम १८0, २७२, २७३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गणेश मुपडे, हे.कॉ. श्रीकृष्ण शिरसाट, शिवाजी घुगे, चालक पंकज शेंडे, पो. कॉ. महेशप्रसाद, प्रफुल्ल माळोदे यांनी केली. ं
मालखेड येथे गुटखा, सुगंधित तंबाखू विक्री करणार्या पानठेल्यावर धाड
Contents hide