मान्सून ट्रेकिंग स्पॉट्स

दोस्तांनो, ट्रेकर्स मान्सूनकाळात मोठय़ा प्रमाणावर ट्रेकिंगसाठी बाहेर पडतात. पावसाळा हा ट्रेकिंगसाठीचा सर्वोत्तम काळ मानला जातो. लवकरच मान्सूनचं आगमन होणार आहे. कोरोनाची प्रकरणं कमी होत असल्यामुळे येत्या काळात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात ट्रेकिंगच्या योजना आखल्या जातील. तुम्हालाही ट्रेकिंगची आवड असेल तर या ठिकाणांचा विचार करता येईल.
* हिमाचल प्रदेश हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण. सध्या वर्केशनसाठीही अनेक जण हिमाचलला जातात. इथे ट्रेकिंगची अनेक ठकाणं आहेत. हाम्टा पास हे असंच एक ठिकाण. नवख्या ट्रेकर्ससाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. कुल्लू खोर्‍यातल्या हाम्टा पासपासून या ट्रेकला सुरूवात होते. हा ट्रेक स्पती व्हॅलीपर्यंतचा ३५ कलोमीटरचा हा ट्रेक आहे. साधारण चार ते पाच दिवसात हा ट्रेक पूर्ण होतो.
* लोणावळ्याजवळचा राजमाची किल्ला ट्रेकर्सना भुरळ पाडतो. राजमाचीचा ट्रेक सोपा असून ट्रेकिंगची सुरूवात करायची असेल तर राजमाचीला जाता येईल. हा ट्रेक अवघ्या ४0 मिनिटांमध्ये पूर्ण होतो.
* सिक्किम हे सुद्धा निसर्गसौंदर्याने नटलेलं राज्य असून पर्यटक मोठय़ा संख्येने इथे जातात. इथलं डिजोंगिरी हे ठिकाण ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. हा २१ किलोमीटरचा ट्रेक असून एक ते दोन दिवसात पूर्ण होतो. ट्रेकिंगची आवड असणारे आवर्जून सिक्किमला येतात.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!