नागपूर : महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री सातत्याने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत असतात. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत असतात. महाविकास आघाडीमध्ये राहून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी भाजप व आरपीआयसोबत युतीचे सरकार स्थापन करावे आणि मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घ्यावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना केले.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदू राष्ट्राचे स्वप्न बघितले. यासाठी त्यांनी भाजपला सोबत घेतले. मात्र, सत्ता स्थापनेच्यावेळी मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत बिनसले. यामुळे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. परंतु तेथेही महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करीत आहे. यामुळे मुख्यमंत्री त्रस्त झाले आहे. शिवसेनेला बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे असे आवाहनही आठवलेंनी यावेळी केले.
‘मविआ’मध्ये राहून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार नाही -आठवले
Contents hide