• Mon. May 29th, 2023

मर्यादा आणि बंधने

भारतीय संस्कृती मधे मर्यादा या शब्दाशी माणसाचे खूप जवळचे नाते आहे. जगतांना प्रत्येकाला काही विशिष्ट गोष्टीच्या मर्यादा पाळाव्या लागतात. त्या कौटूंबिक मर्यादा असो, सामाजिक मर्यादा असो किंवा नैसर्गिक मर्यादा असो! त्या मर्यादा जगण्याचा एक भाग असतो.. मर्यादेत नीतिमूल्ये जोपासली जातात. व्यभिचार, अनिती, स्वैराचार या गोष्टी मर्यादेत राहून च टाळल्या जातात.. आपल्या दिनचर्येत संस्कार म्हणून घातलेल्या मर्यादा या निश्चितच बंधन नसतात. बंधने ही लादली जातात तर मर्यादा ही पाळली जाते.. एखाद्या “पक्षाला” जेव्हा आपण पिंजऱ्यात ठेवतो; तेव्हा आपण न उडण्याचे त्याच्या वर बंधन घालतो, पण रात्री अपरात्री मुलांनी घराबाहेर पडू नये हे मुलांना आईवडिलांनी घातलेले बंधन नसून एक काळजी पोटी घातलेली मर्यादायुक्त बंधने असतात.. प्रत्येकाला स्वतःचे मत स्वतःची एक स्वतंत्र विचारसरणी असते, पण याचा अर्थ असा नाही की मनात येईल तसे वागत सुटावे; कारण इथे सामाजिक मर्यादेचे भान ठेवावे लागते. अभ्यास करतांना जर आईवडील खेळायला मनाई करत असेल तर ते बंधन नाही, तर तो आदेश असतो; आणि त्याचे पालन करणे मुलांचे कर्तव्य.. मर्यादा तोडून वागले तर कर्तव्याचे भान उरणार नाही.. संस्काराची बंधने आपल्यावर त्याच साठी असतात की आपण एक सृजाण नागरिक व्हावे.. मर्यादाशील, कर्तव्यदक्ष, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे, समाजाचे भान ठेवून वागणारे,. सोज्वळ मनाचे नम्र वृत्तीचे आणि दुसऱ्यांचा आदर करणारे असे व्यक्तिमत्व असावे! त्यासाठी मर्यादेचे बंधनात्मक पालन करणे शरीराला एका चांगल्या सवयीच्या बंधनात ठेवणे खूप गरजेचे असते.. माणूस जन्मतःच एक मर्यादा घेऊन जन्माला येतो.. माणूस म्हणून जरी तो स्वतंत्र असला तरी अनेक नात्यांच्या बंधनात तो आजन्म असतो त्यातून त्याची सुटका तो कधीही करू शकत नाही आणि मुक्त होऊन एकटा जगू शकत नाही. तो सतत समाजाने त्याला चांगले म्हणावे; या विचारांच्या बंधनात असतो. कुटुंबाची चौकट लांधून तो बंधनमुक्त होऊ शकत नाही आणि मर्यादा सोडून वागू शकत नाही. जिथे मर्यादा आणि बंधन याचा लवलेश नसतो तिथे मग चौकट नसते आणि जिथे चौकट नसते तिथे माणूस एकाकी असतो! ओलाव्यावाचून जसा “वाळवंट” विराण असतो तसेच माणसाचे जीवन एका काळानंतर विराण होते. म्हणूनच मर्यादा आणि बंधने माणसावर लादलेली नसून तो एक सुजाण नागरिक म्हणून जगण्याचा भाग आहे..

– सौ. निशा खापरे

नागपूर
७०५७०७५७४५

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *