मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा या शोने गेल्या अनेक वर्षात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. या शोमधील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनावर जादू केली. शोमधील कोणतही पात्र असो या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. या शोमध्ये बालकलाकारांची भूमिका साकारणारे कलाकार आता मोठे झाले आहेत. यातीलच एक म्हणजे लहानग्या सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली. निधी भानुशाली खूपच ग्लॅमरस झाली. निधी सध्या जरी या शोचा भाग नसली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते.
तारक मेहता का उल्टा चश्मा या शोमधील सोनू म्हणजेच निधी भानुशालीच्या फोटो आणि व्हिडीओला नेटकर्यांनी मोठी पसंती मिळताना दिसते. निधीचा एक व्हिडीओ सोशल चांगला व्हायरल होतोय. निधी सध्या समुद्र किनार्यावर फिरण्याची मजा लुटतेय. सुमुद्र किनारे आणि जंगलांमध्ये फिरण्याची निधीला आवड आहे. या व्हिडीओत निधी समुद्र किनार्यावर तिच्या लाडक्या श्वानासोबत मजा करताना दिसते.
या व्हिडीओतील निधीचा हिप्पी अंदाज अनेकांच्या पसंतीस उरत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ती म्हणालीय, सूर्यात्साचे विविध रंग. पावसाळ्यातील सूर्यास्त खूपच सुंदर असतो. ढगांच्या आड तो लपला जातो आणि मग अंधार पडेपर्यंत आकाशात वेगवेगळ्या रंगांच्या छटा पाहायला मिळतात. असे सूर्यास्ताचे वर्णन निधीने तिच्या कॅप्शनमध्ये केले. या आधी निधीने शेअर केलेल्या व्हिडीओत ती समुद्र किनारी दगडांमध्ये बसलेली असून आणि एका स्टोव्हवर जेवण बनवताना दिसत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमध्ये निधीने अनेक वर्ष भिडे मास्तरांची मुलीची म्हणजेच सोनूची भूमिका साकारली होती. शोमधील सोनू ते आत्ताची निधी यात मोठा बदल झालेला आहे. निधी आता चांगलीच बोल्ड आणि ग्लॅमरस झाली. निधी भानुशालीला भटंकतीची प्रचंड आवड आहे. तिच्या या भटकंतीमधील अनेक क्षण ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
Related Stories
October 2, 2023
October 2, 2023