“आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हावयाचे असेल तर या सर्व अडथळ्यावर आम्ही मात केली पाहिजे. राष्ट्र निर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल.बंधुत्वाशिवाय असलेली समता व स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल.”
Contents hide
– डॉ.बाबासाहेब आंबेडकर
खंड १८ भाग ३ पान नं.१७५
महाराष्ट्र शासन
भारत हा देश १५ऑगस्ट १९४७ ला ब्रिटीश साम्राज्यवादातून मुक्त झाला.तर २६ जानेवारी १९५० पासून देशात लोकशाही प्रजासत्ताकाला प्रारंभ झाला.संविधानाच्या माध्यमातून लोकांना सामाजिक,आर्थिक,राजकीय, शैक्षणिक हक्क मिळाले.स्वातंत्र्य ,समता , बंधूभाव व न्याय हे उद्दिष्ट्ये असलेले दिशादर्शक संविधानाने प्रजेला नवा जगण्याचा महामार्ग प्रस्थ केला.जातीय,वंशीय,लिंग,धर्म,व प्रदेश यांचे भेदाभेद नष्ट करून मानवाला मानवासारखं जगायला शिकवणारी संजीवनी मिळाली.मनुव्यवस्थेची अमानवीय कौर्यभरी व्यवस्था नष्ट करून समतामूलक व कल्याणकारी समाजवादाची नवी सनद मिळाली.या परिवर्तनानंतरही काही चातुर्धिष्ठित लोक संविधानाला स्वीकारू शकले नाही.आरएसएस ही संघटना देशात धार्मिक विषमतेची पाळेमुळे भक्कम करत चालू लागली.सरकारमधील काही नेत्यांनी त्यांना आसरा व प्राणवायू दिल्याने आज तीने आपले विस्तारणे वाढवले आहे.प्राचीन सभ्यतेचे ढोल पिटून लोकांना पोलराईज करणे व आपला स्वार्थ साधणे हा कुटील डाव ते देशात खेळत आहेत.लोकशाही व्यवस्था उलथवून हुकूमशाही मनुव्यवस्था लागू करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे त्यासाठी राज्य व राष्ट्र यांची नेहमी ते चर्चा करत असतात .ते हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे असे मानतात .यातून देशात पुन्हा फाळणीची बीजे पेरत आहेत तरी अंधभक्ताचे डोळे उघडत नाही.राज्य व राष्ट्र याचा नेमका अर्थ आपण समजून घेतला पाहिजे.
अँरिस्टाटल राज्याची व्याख्येत म्हणतो की,”अनेक कुटूंबे व खेडी मिळून निर्माण झालेला , संपूर्ण आणि स्वयंपूर्ण जीवन हेच सुखी व प्रतिष्ठित जीवन असे ध्येय असलेला संघ म्हणजे राज्य होत.”तर प्रा.ऑगबर्न म्हणतो,”विशिष्ट अशा भूप्रदेशावर सर्वोच्च शासनामार्फत राज्यकारभार करणारी संघटना किंवा यंत्रणा म्हणजे राज्य होय.”यावरून असे लक्षात येते की “विशिष्ट भूप्रदेशावर जेव्हा लोक संघटित होऊन सार्वभौम शासनसंस्था प्रस्थापित करतात तेव्हा त्यास राज्य म्हणतात.
प्रा.बर्जेस राष्ट्र याविषयी म्हणतो की , राष्ट्र म्हणजे भौगोलिक एकता असलेल्या प्रदेशात वास्तव करणारा आणि वांशिक एकता असणारा लोकसमुदाय होय.तर एम हँसर म्हणतो की,समान भाषा किंवा समान वंश यामुळे नव्हे तर लोकांच्या एकत्रित राहण्याच्या इच्छेतून राष्ट्र निर्माण होऊ शकते.
राज्य व राष्ट्र या विवेचनावरून जोपर्यंत आपण गुण्यागोंविदाने ,प्रेमाने व आपुलकीने राहू शकत नाही तोपर्यंत खरे राष्ट्र निर्माण करू शकत नाही.आरएसएस ला अभिप्रेत राष्ट्र फक्त ब्राम्हणी लोकांचे वर्चस्व असलेले आहे.त्यांचा संघचालकाने मांडलेले विचार देशाची प्रभुत्वसंपन्नता लोप करणारे आहे यासाठी भारतीय लोकांनी संघापासून सावध राहावे.
भारतीय संविधानातील पहिली कलम इंडिया अर्थात ,’भारत’ राज्याचा संघ असले अशी आहे .राज्याच्या विकासातूनच देशाचा विकास करता येईल .संघाला अपेक्षित असणारे राष्ट्रीयत्व एका धर्माचे प्राबल्य हे आहे तर भारतीय संविधानाचे देशातील सर्व लोकांमध्ये आमूलाग्र बदल घडावा हे समानसुत्र आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर देश एकजीव होण्याविषयी म्हणतात की,”बहुसंख्याकता मुलतःराजकीय नसून जातीयवादी आहे.अशा जातीयवादी बहुसंख्याकांचे राज्य अल्पसंख्यांकांनी निष्ठेणे स्वीकारले आहे.म्हणून अल्पसंख्यांकाच्या प्रतिभेदभाव न करणे हे आपले कर्तव्य आहे.याची जाणीव बहुसंख्याकांनी ठेवावी.अल्पसंख्यांकत्व टिकून राहणे किंवा एकजीव होणे हे बहुसंख्यांकाच्या वागणूकीवर अवलंबून राहणार आहे.अल्पसंख्याकाच्या विरोधात भेदभाव करण्याची सवय बहुसंख्यांक ज्या क्षणी सोडतील त्या क्षणी अल्पसंख्यांक अस्तित्वात राहण्यास कारण उरणार नाही व ते एकजीव होतील.”ही भूमिका स्वीकारून आपण चाललो पाहिजे तर आपला देश आपले स्वातंत्र्य अबादित ठेऊ शकेल.
देशातील बहुसंख्य लोक हिंदू धर्माचे असले तरी ते धर्मनिरपेक्ष भारत हाच त्याचा प्राण आहे . आपल्या विकासासोबत एससी,एसटी,व अल्पसंख्यांक यांना सोबत घेऊन चालावे लागेल देशातील बहुसंख्यांनी व अल्पसंख्यांक यांनी संविधानाला सर्वोच्च मानून व्यवहार करावा .जातीभेद,धर्मभेद ,भाषा भेद सोडून देशाला राष्ट्र निर्माण करण्यासाठी आयुष्य खर्च कराव.दगंल , अन्याय ,अत्याचार ,दहशतवाद,आंतकवाद,नक्षलवाद,शोषण,
जाळपोळ न करता बंधूभावाने वागावे.भेदाभेदाची निर्मिती करण्याऱ्या कटकारस्थानीपासून आपले व देशाचे संरक्षण करावे.जगात कोणताच वंश शुध्द राहला नाही.संघाची राष्ट्र निर्माण करण्याचा पाया विषमतेवर व अव्यवहारावर आधारीत असल्याने त्यांच्या फसव्या शाब्दिक भुलथापाना बळी पडू नये .तर देशाला एकात्म व एकसंघ ठेवण्यासाठी लढत राहव.देशाचे राष्ट्रीयत्व हे हिंदूत्व नसून भारतीयत्व हेच खरे राष्ट्रीयत्व आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या लोकांना कोणत्याही भेदभाविविना समान राष्ट्रीयत्व, भारतीयत्व प्राण व्हावे यासाठी भारत राष्ट्राची , भारतीयत्वाची संकल्पना मांडली होती.हेच सर्व भारतीयांनी ओळखून चालले तर कोणतीही फितुरवादीवृत्ती भारताचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही.
– संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००