मुंबई : माज्या नवर्याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील सध्या तिच्या खासगी जीवनामुळे चर्चेत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिनं सोशल मीडियावर एका तरुणासोबत फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे ती त्याला डेट करत असल्याच्या चचेर्ला उधाण आलं होतं. त्यानंतर तिनं त्याबद्दल खुलासा केला होता. होय, मी आदित्य बिलागीला डेट करतेय. आम्ही दोघंही सध्या लॉस एंजिलिसमध्ये आहोत आणि एकमेकांसोबत वेळ घालवतोय, असं तिनं एका मुलाखतीत सांगितले होते.
रसिकाने आदित्यसोबतच्या नात्याला दुजोला दिल्यानंतर दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.आता पुन्हा एकदा या दोघांच्या एका व्हिडिओची चर्चा सुरू आहे. रसिकानं नुकताच हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केला आहे. आदित्य परदेशातून भारतात आला आहे. तो जेव्हा एअरपोर्टवर आला तेव्हा त्याला भेटण्यासाठी रसिका इतकी आतुर झाली होती की, त्याला पाहिल्यानंतर ती आनंदाने नाचायला आणि उड्या मारायला लागली. आणि आदित्य जेव्हा एअरपोर्टच्या बाहेर आला तेव्हा रसिकानं त्याला घट्ट मिठी मारली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.
कोण आहे आदित्य बिलागी?
आदित्य इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि सध्या लॉस अँजेलिसमध्ये राहातोय.
बॉयफ्रेंडला एअरपोर्टवर पाहून नाचायला लागली रसिका सुनील
Contents hide