• Sat. Sep 23rd, 2023

बाळासाहेब असते तर नवी मुंबई विमानतळाला शिवरायांचे नाव दिले असते – राज ठाकरे

मुंबई : नवी मुंबई विमानतळ हे नव्याने बांधले जात जरी असले तरी तो मुंबई विमानतळाचाच एक भाग आहे. जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच शिवाजी महाराजांचे नाव दिले असते असे परखड भाष्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीला मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते राज ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, नवीन होत असलेल्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी आहे. सरकारकडून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आग्रह आहे. मी त्यांच्यापुढे वस्तुस्थिती ठेवली. नवीन विमानतळे ही शहराच्या बाहेर होत असतात. जरी ते विमानतळ नवी मुंबईत होत असले तरी ते मुंबईचे विमानतळ असणार आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मुंबईत जागा नसल्यामुळे नवी मुंबईमध्ये विमानतळ होत आहे. त्यामुळे त्या विमानतळाला शिवाजी महाराज यांचे नाव असेल असे मला वाटते. हा मुंबई विमानतळाचा विस्तार आहे. जर आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सुद्धा या विमानतळाला शिवाजी महाराज यांचेच नाव सूचवले असते, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. आता जसे छत्रपती शिवाजी महाराज नाव आहे तेच नाव तिकडे असणार आहे. मुंबईतील विमानतळ हे डोमेस्टिक असेल आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे नाव देणे उचित असेल, ते विमानतळ या विमानतळाचा भाग आहे. त्याचा कोड इडट हेच असणार आहे, असेही राज ठाकरे यांनी समजून सांगितले. विमानांना पाकिर्ंगला जागा नाही म्हणून मुंबई विमानतळाची ही अवस्था आहे. आज महाराजांच्या नावावर चर्चा काय करायची. विमानतळ पहिल्यांदा झाले पाहिजे. आता माझ्या बोलण्यानंतर कोण रस्त्यावर उतरतेय ते बघुया, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,