• Mon. Jun 5th, 2023

बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे वाढते महत्त्व

रोगाचे निदान करण्यासाठी आणि उपचारासाठी जैववैद्यकीय अभियांत्रिकी (बायोमेडिकल इंजिनिअरिंग)चे तंत्र महत्त्वाचे मानले जाते. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, आपत्कालीन विभाग, शस्त्रक्रिया विभाग, वैद्यकीय प्रयोगशाळा यासारख्या ठिकाणी वापरण्यात येणार्‍या वैद्यकीय उपकरण हाताळण्यासाठी बायोमेडिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतो. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात औषध आणि शास्त्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा एक चांगला पर्याय म्हणून उभा राहत आहे. विशेष म्हणजे कृत्रिम अवयवाची निर्मिती करताना बायोमेडिकलचे तंत्र आणि शास्त्राचा आधार घेतला जातो. कृत्रिम अवयव हे गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत असून बायोमेडिकलशिवाय शक्य नाही.
बायोमेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिरिंग क्षेत्रातील तंत्र आणि रचनेचा उपयोग हा वैद्यकीय उपचारासाठी आणि साधनासाठी करणे होय. कृत्रिम हृदयाची रचना हे बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या तंत्राचे फलित मानले जाते. रुग्णांवर उपचार करताना अनेक चाचण्या घेतल्या जातात आणि उपचाराची दिशा ठरविली जाते. त्यासाठी एमआरआय, सिटी स्कॅन, इइजी यासारख्या चाचण्या रोगाचे निदान करण्यास हातभार लावतात. याच बायोमेडिकल इंजिनिअरिंगची विभागणी होऊन त्याचे रूपांतर क्लिनिकल इंजिनिअरिंग आणि रिहॅबिटेशन इंजिनिअरिंगमध्ये होते. इंजिनिअरिंगचे तत्त्व आणि अंमलबजावणीचे सूत्र आपण समजून घेतले तर वैद्यकीय उपकरणाचा वापर करताना त्यांचा वापर करता येऊ शकतो. या क्षेत्रात करिअर करणार्‍या विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.
रुग्णांवर डॉक्टर उपचार करताना बायोमेडिकल इंजिनिअर असलेला सहकारी या तंत्राच्या सहाय्याने मदत करू शकतो आणि डॉक्टरांच्या गरजा पूर्ण करू शकतो. औषध आणि शास्त्र क्षेत्रात काम करणार्‍या विद्यार्थ्याला संयमाबरोबरच रुची असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या शाखेच्या उत्पादन किंवा सेवा क्षेत्रात विद्यार्थी काम करू शकतो. बड्या रुग्णालयात आणि हेल्थकेअर सेंटरमध्ये असणार्‍या अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणावर देखरेख ठेवण्यासाठी क्लिनिकल इंजिनिअरधारक विद्यार्थ्याची गरज असते. उपकरणाची मांडणी करण्यापासून ते त्याची कार्यक्षमता टिकवण्यापयर्ंतची सर्व जबाबदारी क्लिनिकल इंजिनिअरला स्वीकारावी लागते. तर रिहॅबिटेशन इंजिनिअर हा वैद्यकीय उपकरण निर्मिती प्रक्रियेत सहभागी असतो. शारीरिकद.ृष्ट्या आणि मानसिकद.ृष्ट्या विकलांग असलेल्या रुग्णांसाठी उपकरणे तयार करताना सहाय्यभूत ठरू शकतो. बायोमेडिकलधारक विद्यार्थ्याला महिन्याकाठी २५ ते ३0 हजार रुपये वेतन मिळू शकते. अर्थात हॉस्पिटल किंवा वैद्यकीय संस्था मोठी असेल तर अशा ठिकाणी मिळणारे उत्पन्नही चांगले असू शकते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *