बायोपिकसाठी घेतले होते एक रुपयाचे मानधन

नवी दिल्ली : मिल्खा सिंग यांचा बायोपिक भाग मिल्खा भागमध्ये त्यांची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता फरहान अख्तरनेही त्यांना र्शद्धांजली दिली आहे.
मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित २0१३ मध्ये रिलीज झालेला भाग मिल्खा भाग हा बायोपिक मिल्खा सिंग आणि त्यांच्या चाहत्यांसाठी खूप खास होता. दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात मिल्खा सिंग यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि क्रीडा विश्‍वात पदार्पण करण्यापासून ते भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला होता. त्यावेळी मिल्खा सिंग यांनी आपल्या या बायोपिकसाठी केवळ १ रुपया मानधन म्हणून घेतला होता. पण यात एक खास ट्वीस्ट होता. राकेश ओम प्रकाश मेहरा आणि त्यांच्या टीमनं मिल्खा सिंग यांना हे मानधन खास पद्धतीने देण्याचे ठरवले होते. ज्याची आठवण कायम राहील. त्यामुळे त्यांनी मिल्खा सिंग यांना १९५८ मध्ये छापण्यात आलेली १ रुपयाची नोट मानधन म्हणून दिली होती. दरम्यान भाग मिल्खा भाग या चित्रपटा मिल्खा सिंग यांची भूमिका साकारणारा अभिनेता फरहान अख्तरने त्याच्या सोशल मीडियावर मिल्खा सिंग यांच्यासोबतचा फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले , प्रिय मिल्खा जी, तुम्ही गेलात हे मानायला अद्याप माझे मन तयार नाही. एखादी गोष्ट हाती घेतली की तडीस न्यायची सवय मी तुमच्याकडूनच शिकलो. ही गोष्ट मी मनात पुरती भिनवून घेतली आहे. त्यामुळे तुम्ही कायमच माज्यासाठी जिवंत असाल. कारण तुम्ही सहृदय व्यक्ती होता. तुम्ही अनेकांवर प्रेम केले आणि इतकी प्रसिद्धी मिळूनही तुम्हीचे पाय कायमच जमिनीवर राहिले. त्याने पुढे लिहिले की, तुम्ही एका विचार मांडला, एका स्वप्नाचे प्रतिनिधीत्व केले होते. तुमच्याच शब्दांत सांगायचे तर, मेहनत, खरेपणा आणि दृढ निश्‍चयाच्या जोरावर एखादी व्यक्ती गगनाला गवसणी घालू शकते. तुमच्या या विचारांनी आमच्या सगळ्यांचे आयुष्य व्यापले आहे. ज्या व्यक्ती तुम्हाला वडिलांप्रमाणे, मित्राप्रमाणे मानत होते त्यांच्यासाठी तुम्ही आशीर्वाद होता. जे तुम्हाला व्यक्तिगतरित्या ओळखत नव्हते. त्यांच्यासाठी तुम्ही प्रेरणादायी व्यक्तिमत्व होता. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!