- बाबा होते तेव्हा…
- होता या घराला आधारv
- होती जीवनाला दिश
ा
Contents hide
- इच्छांना होत्या अनेक वाटा
- पण अडचणींना नव्हती
- या घरात जागा
- बाबा होते तेव्हा…
- नव्हती गरज सवंगड्यांची
- संख्यांची सोबत्यांची
- तेच द्यायचे अखंड साथ
- बाबा होते तेव्हा…
- माझ्या आयुष्यातली
- गरज ही तेच आणि संतुष्टी ह
ी
- तेच तर होते माझे खरे गुरु
- खरे मार्गदर्शक, खरे हितचिंतक
- बाबा या एका शब्दात
- होतं माझं सगळं जग
- पण ते जग
- आता निसटून गेलं
- देहमय पिंजऱ्यातून
- दूर दूर पळून गेलं
– इंदिरे