काठमांडू : कोरोना विषाणूचा खात्मा करण्यासाठी देशातील विविध भागातून प्रयत्न केले जात आहे. यातच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनिल या औषधाची निर्मिती केली आहे. कोरोना विषाणूवर हे अत्यंत प्रभावी औषध असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. असे असले तरी देशात याच्या वापराला मान्यता देण्यात आलेली नाही. यानंतर शेजारील देश नेपाळ आणि भूतान येथेही कोरोनिल पाठविण्यात आले आहे. असे असले तरी नेपाळने कोरोनिलच्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाबा रामदेव यांना मोठा धक्का बसला आहे. कोरोनिल औषध कोरोना विषाणूच्या संसर्गाविरोधात प्रभावी असल्याचा ठोस पुरावा नसल्याचे नेपाळने म्हटले आहे. कोरोनिलच्या १५00 किट खरेदी प्रकरण्यात योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात आले नसून त्यामुळे कोरोनिलचे वितरण तत्काळ थांबविण्यात आले. बाबा रामदेव यांनी नेपाळमध्ये कोरोनिलचे १५00 किट मोफत पाठवले होते. मात्र नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोनिल किटमधील औषध कोरोनाची लढण्यास प्रभावी नाही.
बाबा रामदेवांना पुन्हा धक्का.!
Contents hide