आम्ही आमचा बाप
उपकार त्यांचे मोजायला
जगात कोणतेच नाही माप
आमची मुले जगावी म्हणून
स्वतःच्या मुलांनाही त्यागले
अखेरपर्यंत बाबासाहेब तुम्ही
आमच्या हक्कांसाठी जगले
लाखो करोडो मुले तुमची
आज घेतात अगदी उंच धाव
याचे सारे श्रेय जाते फक्त
नाव ते एकमेव भीमराव
विचार केला नाही बाबांनी
स्वतःच्या कुटुंबासाठी जगण्याचा
म्हणून आमच्या पिढीचा दृष्टिकोन
तुम्हांला बाप म्हणून बघण्याचा
जन्मदाता बाप सांभाळतो
केवळ आपल्या पोटाची गोळे
पण आमच्या या बापाने
दिलेत आम्हा शिक्षणाचे डोळे
आज जे काही आमच्याजवळ
ते या बापाचं सगळं देणं
सांगा कुणाला जमेल का
बापाचाही इथे खरा बाप होणं
कवी: गणेश रामदास निकम सर
चाळीसगाव गणेशपूर
मो.न.७०५७९०४६७७
९८३४३६१३६४
१५/६/२०२१