• Sun. May 28th, 2023

फादर्स डे आधी सोनू सूदने मुलाला गिफ्ट केली महागडी कार

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या वर्षीपासून कोणत्या ना कोणच्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. दरम्यान, सोनू सूदने फादर्स डेच्या निमित्ताने त्याच्या मुलाला एक गाडी भेट म्हणून दिल्याचे समोर आले आहे. सोनूने काळ्या रंगाची मिर्सिडीज मेबाच जीएलएस ६00 इशांतला भेट म्हणून दिली आहे. या गाडीची किंमत ३ कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे म्हटले जात आहे.
माहितीनुसार, र्मसिडीज मेबाच जीएलएस ६00 ही गाडी गेल्या आठवण्यातच भारतात लॉन्च करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ युट्यूबवर प्रचंड व्हायरल होताना दिसतं आहे. या व्हिडीओ सोनूकडे या गाडीची डिलिव्हरी झाल्याचे दिसतं आहे. त्यानंतर सोनू त्याच्या कुटुंबाला ड्राईवर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. सोनूकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. सोनूला गाड्यांची आवड आहे. सोनूकडे आधीपासून ऑडी क्यू ७, र्मसिडीज बेंझ एमएल क्लास आणि पोश्रे पानामेरा आहे. दरम्यान, सोनू लवकर पृथ्वीराज, अल्लुडू अधुर्स, आचार्य आणि थमिलरसन या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *