• Sat. Sep 23rd, 2023

प्रतिष्ठित प्रशासकीय सेवा

प्रशासकीय अधिकार्‍यांना मिळणारा मान, सन्मान, सोयी-सुविधा आणि संधी यामुळे विद्यार्थी या सेवांच्या परीक्षेसाठी जोमाने तयारी करतात. यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार विविध सेवांमध्ये रूजू होतात. आयएएस, आयपीएस, आयईएस, आयएफएस यासारखे प्रशासकीय सेवांचे विविध विभाग आहे. म्हणूनच यातला नेमका फरक काय, अशा सेवांमध्ये जाण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी जाणून घ्यायला हवं.
अनेकांचं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न असतं. आयएएस म्हणजे इंडियन अँडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (भारतीय प्रशासकीय सेवा). प्रशासकीय परीक्षा आणि मुलाखतींमध्ये उत्तीर्ण होऊन चांगली रँक मिळवणारे उमेदवार आयएएस बनतात. कायद्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याची जबाबदारी या अधिकार्‍यांवर असते. यासह नवी धोरणं आखण्याच्या तसंच कायदे बनवण्याच्या कामातही त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. विविध सरकारी खात्यांचं सचिवपद भूषवण्याची संधी या अधिकार्‍यांना मिळते. जिल्हाधकारी बनून परिसरात सकारात्मक बदल घडवणार्‍या अधिकार्‍यांचं विशेष कौतुक होतं. अर्थातच यासाठी बौद्धिक क्षमतेबरोबरच समाजसेवा करण्याची वृत्तीही असायला हवी.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,