पुणे : रुगणालायत जर रुग्णांना ज्येष्ट अभिनेते अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ कॉल आला आणि बिग बींनी आपल्या चाहत्यांशी संवाद साधला, तर रुग्णालयातील रुग्णाला यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही. असेच पुण्यातील हुबेहूब बिग बी कोरोना रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा काम करत आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथे राहणारे शशिकांत पेडवाल देशभरातील विविध रुग्णालयांतील कोरोना रुग्णांशी संवाद साधून, डॉयलॉगबाजी करून, गाणे गाऊन त्यांचे मनोरंजन करत आहे.
पुण्यातील शशिकांत पेडवाल हे हुबेहूब बीग बी अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसतात. ते पुण्यातील औंध येथील आयटीआय येथे शिक्षक म्हणून काम करत आहे. कोरोनाच्या या महामारीत अनेक संस्था संघटना आपापल्या परीने मदत करत आहेत. आपणही काही तरी मदत करायला हवी, हा विचार करून शशिकांत यांनी आपल्या चेहेर्याचा फायदा घेत विविध रुग्णालयांतील रुग्णांशी बिग बी बनून संवाद साधायला सुरवात केली. महत्वाचे म्हणजे, शशिकांत यांनी देशातील विविध रुग्णालयांतील रुग्णांशी संवाद साधला असता सर्वांना ते बिग बीच असल्याचे वाटले. आपण बिग बींशीच बोलत आहोत, असे त्यांना वाटले. आतापयर्ंत ३00 पेक्षा जास्त रुग्णांशी बोलून त्यांचे मनोरंजन शशिकांत यांनी केले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर रुग्ण मोठय़ा प्रमाणात डिप्रेशनमध्ये जातात. त्यांना दिलासा देण्याचे काम शशिकांत करत आहे. शशिकांत बीग बी अमिताभ बच्चन यांचा हुबेहूब अवतार घेऊन कोरोना रुग्णांशी संवाद साधत आहेत. रुग्णांच्या फरमाईशनुसार कधी बाबूजींच्या कविता, तर कधी डॉयलॉग, तर कधी गाणे गाऊन ते रुग्णांना धीर देत आहेत. ही वेळ लोकांची मदत करण्याची आहे. लोक माझ्याशी संवाद साधून खूप आनंदी होत आहे. त्यांना वाटते की आपण खरेच बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधत आहोत, असे शशिकांत यांनी सांगितले. शशिकांत अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करतात. तसेच, ते स्टँड अप कॉमिडी देखील करतात. याआधी २0१९ मध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी भेट झाली होती. माझ्या या कार्याची सर्वच जण दखल घेत आहेत आणि प्रशंसा देखील करत आहेत. मला आशा आहे की नक्कीच खरे बिग बी देखील याची दखल घेतील. आता जर त्यांची भेट झाली तर खूपच आनंद होईल, असे शशिकांत यांनी सांगितले.
पुण्यातील ही व्यक्ती चक्क बीग बीसारखा दिसते, कोरोना रुग्णांचे करतो मनोरंजन
Contents hide