राळेगाव: आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्यांना पावसाच्या आगमनाची ओढ लागली होती मृग नक्षत्रात हलक्या सरी कोसळल्याने शेतकर्याने शेतात लावणी सुरू केली होती परंतु मृगाच्या शेवटी आठ दिवस पाऊस न पडलयाने दुबार पेरणी करावी लागते की काय या चिंतेत शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता परंतु मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. यंदा खरीप हंगामाची सुरुवात सोयाबीन बियाण्याच्या कृत्रिम टंचाईच्या समस्येने झाली त्यात खताच्या दराची अचानक झालेली वाढ नंतर शासनाच्या वतीने अतिरिक्त वाढ कमी होत नाही तोच बियाणे टंचाई निर्माण झाली अशा परिस्थितीचा सामना शेतकरी करत असताना पावसाचे आगमन रखडल्याने खरिपाची पेरणी लांबणीवर पडणार की काय आणि पेरण्या लांबल्या तर शेतकर्यांचे नियोजन कोलमडून पडणार अशी विचित्र अवस्था शेतकर्यांची झाली होती दरम्यान मंगळवारी सहा वाजताच्या सुमारास आभाळात भराभर ढग जमा होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला व वादळासह पावसाने एक तास हजेरी लावत शेतकर्यांमध्ये आनंद पेरला गेला तेव्हा होता तालुक्यातील शेतकर्यांना पावसाच्या आगमनाने सर्वत्र समाधान व्यक्त होत असला तरी अजूनही सुरुवातीला भरपूर प्रमाणात पाऊस होणे आवश्यक आहेत त्यामुळे पेरण्या प्रारंभी जरी होत असल्या तरी तालुक्यात जोरदार पावसाची अपेक्षा शेतकरी करीत आहे.
पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला
Contents hide