पशुवैद्यकीय अधिकार्‍याला कार्यालयात डांबले

चांदूरबाजार : चांदूरबाजार तालुक्यातील बेसखेड येथील पशुपालकाच्या, २00 बकर्‍यांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला.या सर्व बकर्‍या कशामुळे मरण पावल्या याचा शवविच्छेदन केल्यानंतरचा, वैद्यकीय अहवाल मागिल महिन्यापासून मिळालेला नाही.परीणामी संबंधीत शेतकर्‍यांना पशू विमा मिळू शकला नाही.त्यामुळे शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान झाले. या कारणास्तव संतापलेले पशुपालक रवी पाटलील यांनी सोमवारी चांदूर बाजार येथील,तालुका पशुवैद्यकीय अधिकारी चेतन सोळंके यांना त्यांच्या दालनात कोंडले. या प्रकाराने पशु वैद्यकीय विभागात खळबळ माजली. मागिल काही दिवसांपासून आपल्या भोंगळ कारभार साठी चर्चेत असलेले,तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुपालकाची हेळसांड सुरू आहे. तालुक्यात मृत पावलेल्या जनावरांची साधी नोंद सुद्धा या कार्यालयात नाही. तसेच मृत जनावरांचा शवविच्छेदन नंतर प्रयोगशाळा मध्ये, तपासणी साठी पाठविलेल्या नमुना ची नोंद सुद्धा कार्यालयात उपलब्ध नाही. या सर्व गैरप्रकारामुळे पशुपालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पशुपालक आपल्या जनावरांचे काळजीपूर्वक पालन पोषण करतो. परंतू तालुका पशु वैद्यकीय अधि कार्‍यांच्या ढिसाळ कारभार मुळे, आपल्या जनावरांना योग्य उपचार मिळत नसल्याची आरोप पशुपालकांकडून केला जात आहे.तसेच पशुवैद्यकीय दवाखान्याच्या या अवस्थेला, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. असाही आरोप पशुपालकांकडून होत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भोंगळ कारभाराचा फटका, तालुक्यातील बेसखेडा येथील पशुपालक रवी पाटील यांनाही बसला. त्यांची बकरी शुक्रवारी सकाळी मरण पावली. त्याची माहिती पशुपालक रवी पाटील यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना दिली. मात्र यावेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने या घटनेची माहिती, जिल्हा पशुसंवर्धनअधिकार्‍यांना देण्यात आली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्‍यांनी शवविच्छेदन करिता पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून दिला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्या जनावराचा शवविच्छेदन करण्यात आले. मात्र या जनावराचे नमुने प्रयोगशाळात, सोमवारी दुपारपयर्ंत पाठवण्यात आले नाही. यामुळे संतापलेले पशुपालक पाटील यांना संबंधित अधिकार्‍याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने ,त्यांनी प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी ला त्यांचा कार्यालयातच बंद केले. सदर प्रकारची माहिती वरिष्ठांना देण्यात आल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, सुधीर जिरापुरे व प्रभारी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी राजेंद्र देशमुख, यांनी चांदूरबाजार गाठून तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याचा ढिसाळ कारभार असल्याचे मान्य केले. तर लवकरच दवाखान्यातील हा कारभार सुधारणार असल्याचे सांगून, मृत बकर्‍यांचा प्रयोगशाळा अहवाल देण्याचे आश्‍वासन देऊन पशुपालक पाटील यांची समजूत घालण्यात आली. त्यानंतर डांबून ठेवलेल्या अधिकार्‍याला सोडण्यात आले. तालुक्यात कोणतेही जनावर मृत्यू पावल्यानंतर शवविच्छेदन करून, त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. पशु किंवा पशुधनाचा कशाने मृत्यू झाला.याचे नेमके कारणाची माहिती पशुपालकांना देण्यात येते. मात्र दवाखान्यात मागिल एका वषार्पासून याबाबतचे रेकॉर्डच उपलब्ध नाही.प्रयोग शाळेत पाठवलेल्या नमुन्यांची नोंद नाही. यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यातील ढिसाळ कारभार मध्ये सुधारणा होणे गरजेचे झाले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!