• Sat. Sep 23rd, 2023

परतवाडाजवळ अपघातात दोन ठार, कारचालक गंभीर

अचलपूर : तालुक्यात अपघाताचे सत्र सुरू असून, शुक्रवारी पुन्हा परस्परविरुद्ध येणार्‍या इंडिका व दुचाकी एकमेकांवर जोरदार धडकल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास परतवाडा अंजनगाव मार्गावर सावळीदातुराजवळ झाला. अब्दुल गफ्फार शेख हुसैन व अब्दुल जलील, अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर कारचालक नीलेश दुरबुडे गंभीर जखमी आहे.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवार, ११ जून रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास परतवाडा अंजनगाव मार्गावरील सावळी दातुरा बुलढाणा वेअर हाऊससमोर इंडिका क्र. एम.एच. 0४ डी.आर. ६९९ व दुचाकी क्र. एम.एच. २७ बी.जी. ६२५३ परस्पर विरुद्ध येत होते. त्या एकमेकांवर जोरदार धडकल्या. या अपघातात दयार्बाद येथील गफार व जलील हे दोघे दुचाकीस्वार इंडिका कारखाली दबले. त्यांना अँम्बुलन्समध्ये आणताना त्यांचा मृत्यू झाला. इंडिका चालक नीलेशची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघात होताच आजूबाजूचे लोक मदतीला धावले व जखमींना सावळी दातुरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताने रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प होती. गंभीर जखमी नीलेश दुरबुडे पीएससी केंद्र पथरौत येथील एमपीडब्ल्यू पोस्टवर कार्यरत होता. मृत्यू झालेल्या दोघांच्या मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे शवविच्छेदन शनिवारी सकाळी होणार आहे .

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,