बीड : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील मोंढा परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील अँड. पूजा वसंत मुंडे (वय -२५) यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. न्यायाधीशाची परीक्षा पास होऊनही लॉकडाऊनमुळे पूजा यांचे न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. वयाच्या २५ व्या वर्षी एवढे मोठे यश संपादन केल्यानंतर एका दुर्दैवी घटनेमुळे तिला जीव गमवावा लागला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी सायंकाळी परळी वैजनाथ परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान मृत पूजा यांच्या मजल्यावरील दार उघडे राहिल्याने वरच्या घरात पाणी शिरले होते. हे दार बंद करण्यासाठी गेले असता पूजा यांना विजेचा जोरदार धक्का बसला आहे. यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वरच्या मजल्यावरील रुममध्ये पावसाचे पाणी साचल्याने विजेच्या बोर्डातून संपूर्ण रुममध्ये करंट उतरला होता. त्यामुळे विजेचा धक्का बसून पूजाचे निधन झाले आहे. अँड. पुजा मुंडे यांनी एल एल बी. एल. एल. एम.पर्यंतचे शिक्षण घेतले होते. पूजाने एल. एल. एमची पदवी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून घेतली होती. यामध्ये तिने विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकावला होता. त्याचबरोबर २0२0 मध्ये तिने न्यायाधीशाची परीक्षाही उत्तीर्ण झाली होती. न्यायाधिशाच्या परीक्षेत पूजा मुलींमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकवला होता. त्याचबरोबर एल.एल.बीची पदवी घेताना पूजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातूनही दुसरा क्रमांक पटकावला होता.
न्यायाधीशाची परीक्षा पास होऊनही अधुरे राहिले स्वप्न
Contents hide