• Wed. Jun 7th, 2023

नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणार्‍या आरोपीस सूरत येथून अटक

हिंगणघाट : नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणार्‍या आरोपीस सूरत (गुजरात) येथून अटक करण्यात आली.फिर्यादी तनया विनायकराव श्रीराव, रा. धनोडी (बहा), ता. आर्वी जि. वर्धा यांनी त्यांना नोकरीची आवश्यकता असल्याने क्वीकर या साइटवर नोकरीकरीता त्यांची माहिती अपलोड केली. फिर्यादी यांना त्यांच्या ई-मेलवर प्रेलिक्स टेक्नॉलॉजी कडून नोकरीबाबत ई-मेल प्राप्त झाला व फिर्यादी यांना कागदपत्रे पाठविण्यास सांगितले व काही दिवसाने वेगवेगळया मोबाईल नंबरवरून कॉल करून नोकरी देण्याचे आश्‍वासन देवून वेळोवेळी ऑनलाईन गूगल-पे द्वारे पैसे भरण्यास सांगितल्याने एकुण २,३९,000 रु.भरले. परंतु कोणतीही नोकरी न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पोलीस स्टेशन आर्वी येथे २८ मे रोजी अप क्र. ४0७/२0२१ कलम ४२0भादंवि सहकलम ६६ (ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेल, वर्धा मार्फत करण्यात आलाअसून सदर गुन्ह्यामध्ये तांत्रिक माहिती काढण्यात आली व मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून आरोपी हे जिल्हा सूरत राज्य गुजरात येथील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी रोहित रमेशभाई टोपलीवाला , वय २६ वर्ष, रा. सुरत याने स्वत:चे नावाने कनेक्शन नेटवर्क अशी बनावट कंपनी बनवली होती तसेच आरोपी विक्की अशोकभाई पोमला, वय २0 वर्ष, रा. अंबिका नगर सोसायटी, रामनगर, सूरत याने स्वत:चे नावाने मेगास्टार सोल्यूशन अशी बनावट कंपनी बनवली व या कंपनीद्वारे नोकरीचे आमिष दाखवून सदर दोन्ही आरोपी हेलोकांची फसवणूक करीत होते. सदर दोन्ही आरोपीतांवर सलग ५ दिवस पाळत ठेऊन २३जून रोजी वरील दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून कॉल सेंटरकरीता वापरलेले १अँड्रॉइड मोबाईल,१0 साधे, असे १0,000 रु. जप्त करून गुन्हा उघडकीस आणला. वर नमूद गुन्ह्याचा सुरत येथे तपास करीत असतांना अहमदाबाद सायबर सेलला पाहिजे असलेला आरोपी यश विश्‍वकर्मा, रा, नानपुरा, सुरत हा वर्धा यांना मिळाल्याने त्यांचे स्वाधीन करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अ. पो. अधीक्षक यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे सपोनि. महेंद्र इंगळे,गोपाल ढोले,विशाल मडावी,अनुप कावळे, अंकित जिभे, राजू राऊत, प्रदिप दातारकर व सेलचे चमूने केले आहे.
(Images Credit : Lokmat)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *