• Sun. Jun 4th, 2023

नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बरसल्या ‘मृगधारा’

चांदूरबाजार : स्थानिक महसूल विभागाकडून साधारणत:एक जून पासून मान्सून पूर्व व मान्सूनच्या पावसाची, महसुली मंडळ निहाय रितसर नोंद घेतल्या जाते.त्यानुसार यावर्षीचा पहिला पाऊस ८ जूनला, रात्री ८.३0 ते १0.३0 दरम्यान तालुक्यात मृगधारांनी धरणी मातेला भिजविले. मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवसी,मृगधारा बरसल्याचा आनंद तालुक्यातील नागरिकांनी अनुभवला. स्थानिक महसूल विभागा कडून प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील सात महसूली मंडळा पैकी, सहा महसूली मंडळात सरासरी १७.0३ मी.मी.ईतक्या पावसाची नोंद झाली आहे.मागिल वर्षी याच तारखे पयर्ंत, तालुक्यात ३८.७५ मी. मी. एवढा पाऊस झाला होता.तालुक्यात मंगळवारी झालेल्या पावसात ब्राम्हणवाडा थडी मंडळात दमदार पाऊस झाला.या मंडळात सर्वाधिक ३५ मी.मी.ईतक्या पावसाची नोंद झाली.या मंडळातील काही गावांमध्ये रात्री पूर सदृस्य स्थिती निर्माण झाली होती.परंतू हा पहिलाच पाउस असल्यामुळे, कोणतेही नुकसान झाले नाही. तसेच चांदूरबाजार मंडळात १८.0१ मी. मी. आसेगाव मंडळात २२.२0 मी. मी.करजगांव म.ंडळात १२ मी. मी.शिरजगांव कसबा मंडळात १५ मी. मी.बेलोरा मंडळात १७.0४ मी. मी. ईतक्या पावसाची नोंद झाली आहे.तर तळेगाव मोहना या मंडळात मात्र पाऊस निरंक आहे. तालुक्यात मृगधारा बरसल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या पावसामुळे बाजार पेठेत बियाणे, खते व इतर शेतीसाहीत्य खरेदीसाठी शेतकर्‍यांची गर्दी वाढली आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *