• Mon. May 29th, 2023

दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम निवडताना..!

जर आपल्याला एखाद्या कारणावरून कॉलेजमध्ये जाता येत नसेल तर डिस्टन्स एज्युकेशन (दूरस्थ शिक्षण) हा एक उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो. देशात आजघडीला ५0 लाखाहून अधिक विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून अभ्यास करत आहेत. देशभरात ८00 हून सरकारी आणि अभिमत विद्यापीठ आहेत. यावरून दूरस्थ शिक्षणाचे महत्त्व आणि व्याप्ती लक्षात येते.
दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मिळवलेली पदवी नियमित पदवीप्रमाणेच असते. या पदवीचा उपयोग करिअरचा ग्राफ उंचावण्यासाठी करू शकतो. भारतातील अनेक भागात आजही जिलच्या ठिकाणी कॉलेज किंवा विद्यापीठ नाहीत. तेथे दूरस्थ शिक्षण उपयुक्त ठरत आहे. हे एक शिक्षणाचे लवचिक माध्यम मानले जाते. हा अभ्यासक्रम करताना विद्यार्थी आपले छंदही जोपासू शकतो किंवा जबाबदार्‍या व्यवस्थित पार पडू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूरस्थ शिक्षण हे नोकरदार आणि व्यापार करणार्‍या मंडळींना, युवकांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देते. डिस्टन्स लनिर्ंग सेंटरमध्ये डिप्लोमा, बॅचलर डिग्री, पीजी आणि मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम चालवले जातात. अनेक ठिकाणी डिस्टन्स लनिर्ंग सेंटरमध्ये प्रोफेशनल कोर्सदेखील चालवतात. हे अभ्यासक्रम रोजगार मिळवून देण्यास पूरक असतात. त्यात र्जनालिझम अँड मास कम्युनिकेशन, लायब्ररी सायन्स, कॉम्प्युटरशी निगडित अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ओपन युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवणे अवघड नाही.
इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आदी. हे विद्यापीठ नियमासंदर्भात खूपच लवचिक असतात. या ठिकाणी अभ्यासक्रमाचे शुल्कदेखील सामान्य संस्थांच्या तुलनेत कमीच असते. अँकॅडेमिक माहितीसाठी या अभ्यासक्रमाचे हे कोर्स उत्तम मानले जातात. अनेक विद्यापीठांत विकएंड वर्ग असतात. त्यात नोकरदार मंडळींना हजर राहण्याबाबत काही सवलत दिली जाते. शिक्षण आणि नोकरी यादरम्यानच्या वेळेचा वापर करणार्‍यांसाठी विद्यापीठ हे ई-क्लासपासून कमी कालावधीच्या नियमीत वर्गाचे आयोजन करते. जी मंडळी नियमित कॉलेज करू शकत नाही अशांसाठी अभ्यास करून करिअर करण्यासाठी ओपन युनिव्हर्सिटीचे अभ्यासक्रम हे एक चांगला पर्याय मानला जातो.
दूरस्थ शिक्षणाचे वैशिष्ट्ये – दूरस्थ शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्याला नियमितपणे एखाद्या शिक्षण संस्थेत हजर राहून अभ्यास करण्याची गरज भासत नाही. माहिती तंत्रज्ञानाची क्रांती आणि इंटरनेटमुळे दूरस्थ शिक्षण पद्धत ही खूपच सुलभ झाली आहे.
व्हिज्युअल क्लासरूम लनिर्ंग, इंटरॅक्टिव्ह ऑनसाईट लनिर्ंग आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विद्यार्थी देशाच्या कोणत्याही भागातून घरबसल्या अभ्यास करू शकतात. दूरस्थ शिक्षणाचे शुल्क खूपच माफक असते. जॉब करण्याबरोबरच अभ्यासही करता येतो.
कमी गुण असतानाही आवडीचा अभ्यासक्रम निवडता येतो. कोणत्याही अभ्यासक्रमाला वयाचे बंधन नाही. कोणत्याही अभ्यासक्रमासमवेत व्होकेशनल कोर्स तसेच प्रोफेशनल कोर्सदेखील करता येतात. दूरस्थ अभ्यासक्रमाची निवड करताना काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. ते पुढीलप्रमाणे सांगता येतील.
मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेची निवड : दूरस्थ शिक्षणासाठी विद्यापीठ किंवा कॉलेजची निवड करताना त्या संस्थेतील दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमाला यूजीसीची मान्यता आहे की नाही हे पडताळून पाहावे. जर एखाद्या विद्यार्थ्याला कायदेविषयक पदवी अभ्यासक्रम निवडायचा असेल तर संबंधित संस्थेतील अभ्यासक्रम यूजीसी मान्यताप्राप्त आहे की नाही हे पाहावे. मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी मिळवल्यास नोकरी आणि पदोन्नतीसाठी फायदा होतो.
अँकॅडेमिक लाभ : दूरस्थ शिक्षण पद्धतीत अभ्यासक्रमाची निवड करताना भविष्यातील उपयुक्ततता लक्षात घ्यायला हवी. ज्याप्रमाणे एखादा कर्मचारी हा कौशल्यात भर घालण्यासाठी दूरस्थ शिक्षणाची निवड करतो, तसेच विद्यार्थी हे देखील लिखाण कौशल्य, विेषण वृत्ती, संघटनात्मक कौशल्यासाठी दूरस्थ शिक्षणाची निवड करतात. शनिवारी-रविवारी होणार्‍या वर्गाचा दर्जा, पुस्तकांची उपलब्धता, कर्मचारी वर्ग आदींची माहिती घेणे अनिवार्य ठरते.
तंत्रज्ञानाची उपलब्धता : दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम निवडताना सहाय्यभूत ठरणार्‍या पूरक साधनांची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. डीव्हीडीच्या मदतीने अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. याशिवाय ऑनलाईनवरही संबंधित अभ्यासक्रमाची माहिती देखील मिळवावी.
प्रतिष्ठित अभ्यासक्रम : दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमाची निवड करताना अभ्यासक्रमाची प्रतिष्ठा, उपयुक्तता लक्षात घ्यायला हवी. यासाठी माजी विद्यार्थ्यांची भेट घेऊन संबंधित अभ्यासक्रमाची माहिती घ्यावी. तसेच इंटरनेटवरही अभ्यासक्रमाचा शोध घ्यावा आणि त्याची व्याप्ती जाणून घ्यावी. जर दुय्यम प्रकारचा अभ्यासक्रम निवडल्यास करिअरसाठी त्याचा फारसा उपयोग होत नाही. तसेच नामांकित संस्था आणि विद्यापीठाची निवड केल्यास प्रोफाईल सुधारण्यास मदत मिळते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *