अमरावती : कोरोनाबाधितांची कमी होत चाललेली संख्या शून्यावर येऊन ठेपण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूकीचे पालन सर्वांनी करण्याचे आवाहन करत, संचारबंदी कालावधीत सूट देणारा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला. हा आदेश १६ जून रोजी सकाळी ७ पासून लागू राहील. या आदेशानुसार सर्व दैनंदिन व्यवहार, जीवनावश्यक आणि बिगर जीवनावश्यक दुकाने यांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक असलेली किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य पेय विक्रेता यांची दुकाने, मॉल्स, पिठाची गिरणी व सर्व प्रकारची खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यासह) दुग्ध विक्री केंद्रे, दुग्धालय, डेअरी, दूध संकलन केंद्र, दूध वितरण व्यवस्था, पाळीव प्राणी यांची खाद्यपदार्थ विक्री दुकाने, कृषी सेवा केंद्रे, कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योगगृहे, शेती अवजारे आणि शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, सर्व प्रकारची बिगर जिवनावश्यक सेवा अंतर्गत असलेली दुकाने, प्रतिष्ठाने, सर्व प्रकारची मद्यागृहे, मद्य दुकाने, कृषी संबंधित सर्व प्रकारची कामे, बांधकामे, सर्व प्रकारची शासकीय रास्त भाव दुकाने, चष्म्याची दुकाने, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर आदी.तिसरी लाट येऊ नये व कोरोना साथ समूळ संपुष्टात यावी, यासाठी कोविड प्रतिबंधात्मक वर्तणूकीअंतर्गत मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायजर, लसीकरण व टेस्टिंग व आयसोलेशन या पंचसूत्रीचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी नवाल यांच्याकडून करण्यात आले आहे. कुठलीही लक्षणे दिसत असतील तर चाचणी करुन घ्यावी. तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
दुकानांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत परवानगी
Contents hide