नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाअंतर्गत व्हॅक्सिन फॉर ऑल मोहिमेअंतर्गत सोमवारपासून तिसर्या टप्प्यातील मोफत लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मोफत लसीकरण सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ५0 लाखांहून अधिक लसी देण्यात आल्या असून नवीन विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे. सायंकाळी चार वाजेपयर्ंत ४९ लाख ७५ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. एका दिवसातील हे सर्वाधिक लसीकरण असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात आणि हरयाणा या भाजपाची सत्ता असणार्या राज्यांमध्येच एकूण लसीकरणापैकी २६ लाख लसी देण्यात आल्या आहेत.
या लसीकरणाच्या माध्यमातून देशात कोरोनामुळे निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, असे मत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे म्हणजेच आयसीएमआरचे सभासद असणार्या गिरीधर बाबू यांनी व्यक्त केले. देशातील आरोग्याविषय संशोधनासाठी आयसीएमआर ही एक प्रमुख संस्था आहे.
२१ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या मोफत लसीकरणाच्या तिसर्या टप्प्यामध्ये केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस उपलब्ध करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात जून रोजी घोषणा केली होती की आता नवीन धोरणानुसार राज्यांना लस निर्मिती कंपन्यांकडून लसी विकत घेण्याची गरज नाहीय. केंद्र सरकारच ७५ टक्के लसी विकत घेऊन त्या राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशामध्ये मोफत वाटणार आहे.
भारतामध्ये कोरोना लसीकरण मोहीम ही १६ जानेवारीपासून सुरु झाली. पहिल्या टप्प्यामध्ये सर्व आरोग्य कर्मचार्यांचे, ६0 वर्षावरील लोकांचे आणि नंतर ४५ वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात आले. या टप्प्यातील लसीकरण ३0 एप्रिलपयर्ंत सुरू होते. दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकराने लस निर्मिती कंपन्यांकडून १00 टक्के लसींचा साठा खरेदी केला होता आणि तो राज्यांना मोफत वाटला होता. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मे पासून केंद्र सरकारने वयाची अट कमी करत ती थेट १८ वर्षांपयर्ंत आणली. तसेच केंद्राने राज्यांवर १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची जबाबदारी सोपवली.
दिवसभरात ५0 लाख लोकांना लस
Contents hide