तीन रुग्णांचा मृत्यू; ७२ पॉझिटिव्ह

अमरावती : जिल्ह्यात कोरोना रुग्णांसह मृतकांमध्ये देखिल नव्याने वाढ होत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा कसोसीने प्रयत्न करीत आहे. १८ जुन रोजी जिल्ह्यात ७२ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, आतापर्यंत जिल्ह्यात ९५ हजार ४५४ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. ९२ हजार ८९४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. १ हजार २१ रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा वाढ पहावयास मिळत असून, शुक्रवारी ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण १ हजार ५३९ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहे.
मान्सून वेळेवर दाखल झाल्यामुळे सर्वत्र पावसाचा गोंधळ पहावयास मिळत आहे त्यातच शेतीच्या कामाला वेग आल्याने बाजारपेठामध्ये शेतकर्‍यांसह जनसामान्याची देखिल मोठी वर्दळ पहावयास मिळत आहे. याच गर्दीमुळे कोरोना संक्रमनाचा धोका वाढला असून, दोन ते तीन दिवसांपासून रुग्णसंख्येमध्ये देखिल वाढ पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर दैनंदिन गर्दीचा प्रवाह हा मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोरोना संक्रमनाचा धोका देखिल बळावल्याचे दिसुन येत आहे. दोन दिवसापासून कमी असलेल्या रुग्ण संख्येमध्ये अचानक दुप्पटीने वाढ झाल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेच्या भौवया देखिल उचावल्याचे दिसून येत आहे. महा नगरपालिका प्रशासनाकडून शक्य तोपर्यंत केल्या जात असले तरी अनेक नागरिक हे अदयापही कोरोना चाचणी करून घेण्यास इच्छूक नसल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासनाकडून मोठय़ा प्रमाणात जनजागृती केल्या जात असतानादेखिल अनेक नागरिकांच्या मनातील भिती घालविण्यास प्रशासन अद्यापही अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे शहरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसून येत आहे. १८ जून रोजी जिल्ह्यात ७२ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात ९५ हजार ४५४ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. ९२ हजार ८९४ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असून, १ हजार २१ रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा वाढ पहावयास मिळत आहे. शुक्रवारी ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण १ हजार ५३९ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!