• Thu. Sep 28th, 2023

तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजनचे नियोजन करा-जिल्हाधिकारी अमोल येडगे

यवतमाळ : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात ऑक्सिजन प्लँट उभारणीसोबतच त्याचा योग्य वापर, ऑक्सिजन गळती थांबविणे, ऑक्सिजन ऑडीटमधील परिच्छेदांचे अनुपालन, ऑक्सिजनची सुयोग्य वाहतूक, पर्याप्त ऑक्सिजन सिलेंडरची खरेदी, ऑक्सीजन सिलेंडर रिफीलिंग युनीट, ऑक्सिजनचा राखीव साठा ठेवणे यासोबतच ऑक्सिजनच्या सुयोग्य वापरासंबंधी डॉक्टर, परिचारिका व तांत्रिक कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे इ. ऑक्सिजन व्यवस्थापनाच्या बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज कोरोना टास्क फोर्स समितीच्या बैठकीत दिल्या.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वर्‍हाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर व रुग्णालयात वाढविण्यात येणार्‍या ऑक्सिजन खाटा, ऑक्सीजन सिलेंडर व इतर साहित्य संबंधित पुरवठादारांकडून तातडीने प्राप्त करून पुढील १५ दिवसांत जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालये परिपूर्ण तयारीने अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात सध्या कोविड तपासण्याचे प्रमाण कमी दिसून येत आहे, त्या वाढवून दररोज दोन ते तीन हजार तपासण्या करण्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणाबाबतही त्यांनी आढावा घेतला. तत्पूर्वी आज सकाळी राज्याचे मुख्य सचिव यांनी सर्व जिल्ह्यांचा कोविडच्या अनुषंगाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ज्या अडचणी आल्या त्या तीसर्‍या लाटेत कराव्या लागू नये म्हणून आवश्यक ऑक्सिजन स्टोरेज व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले तर जिल्ह्यातील ऑक्सिजन स्टोरेजशी संबंधित सर्व कामे ३१ जुलैपयर्ंत पुर्ण करण्यात येतील असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. बैठकीला आरोग्य विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,