मुंबई : बॉलिवूडमध्ये दृश्यममध्ये अजय देवगनच्या ऑनस्क्रिन मुलीची भूमिका अभिनेत्री इशिता दत्ताने साकारली होती. आपल्या उत्तम अभिनयाने आणि अदाकारीने तिने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. तिचे काही हॉट फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंवर सार्यांचच नजरा सध्या खिळल्या आहेत. इशिता दत्ता अभिनेत्री तनुश्री दत्ताची छोटी बहिण आहे. इशिता दत्ता द गर्ल ऑन द ट्रेन चित्रपटाही झळकली होती. आता इशिताने आपले काही सुंदर फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती हॉट फिगर मेंटेन ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते. इशिता दत्ताने २८ नोव्हेंबर, २0१७ मध्ये वत्सल सेठशी विवाह केला होता. वत्सल तिच्यापेक्षा वयाने १0 वर्षांनी मोठा आहे. सध्या ती आता आपले वैवाहिक जीवन जगत आहे. वत्सल आणि तिने लाईफ ओके चॅनेलवरची मालिका रिश्तों का सौदागर-बाजीगरमध्ये एकत्र काम केले होते. लोकप्रिय टीव्ही मालिका ये रिश्ता क्या कहलाता हैच्या निर्मात्याकडून दृश्यम फेम इशिता दत्ताकडे या भूमिकेसाठी ऑफर आली होती. इशिताने ही भूमिका करण्यास स्पष्ट नकार दिला होता. याचे कारण, अद्यापही समोर आलेले नाही. इशिता दत्ताने कपिल शर्माचा चित्रपट फिरंगीमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून डेब्यू केले होते.
तनुश्री दत्ताची लहान बहीण इशिताच्या हॉट फिगरने नेटकर्यांना लावले वेड
Contents hide