अमरावती : जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या आता जवळजवळ शुन्याच्या दिशेने वाटचाल करीत असुन १२ जुन रोजी जिल्हयात १0२ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ९४ हजार ९५९ रुग्ण हे जिल्हयात आतापर्यत कोरोनाग्रस्त आढळुन आले असुन ९१ हजार ४0३ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. १ रुग्णाचा मृत्यू झाला असुन जिल्हयात आतापर्यत कोरोनामुळे १ हजार ५२४ रुग्ण दगावले आहेत. २ हजार ३२ रुग्णांवर अदयापही उपचार सुरू आहे.जिल्हाप्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर अमरावती जिल्हा हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. काही दिवसापूर्वी जिल्हयात सातत्याने वाढत असलेले रुग्ण आणि कोरोनाबाधित रुग्णांचे होणारे मृत्यू यामुळे जिल्हयात सर्वत्र निरुत्साही वातावरण पसरले होते. मात्र महानगर पालिका प्रशासन आणि अरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे जिल्हयात आज कोरोनाची स्थिती ही समाधान कारक आहे. विशेष म्हणजे जिल्हयात गेल्या काही महिन्यापासुन बंद असलेले व्यापार हे पूर्वपदावर आल्यामुळे बाजारपेठामध्ये देखिल आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.मात्र कोरोना हा अदयापही संपलेला नसुन तिसर्या लाटेचा शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये व प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.१२ जुन रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात १0२ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. ९४ हजार ९५९ रुग्णांना आतापर्यत कोरोनाची लागन झाली असून ९१ हजार ४0३ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. २ हजार ३२ रुग्ण हे अदयापही एॅक्टिव्ह आहे. एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असुन जिल्हयात आतापर्यत १ हजार ५३४ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहेत.
जिल्ह्य़ात कोरोना रुग्णांची शून्याकडे वाटचाल, १0२ पॉझिटिव्ह
Contents hide