अमरावती : जिल्हावासीयांसाठी आंनदाची बातमी असुन जिल्हयात आज केवळ १३४ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असुन ९४ हजार ६२४ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असुन १ हजार ६८१ रुग्ण हे आतापर्यत कोरोनामुळे दगावले आहे. ९0 हजार ४१0 रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असुन २ हजार ७0२ रुग्ण हे रुग्णालयातल उपचारार्थ दाखल आहेत. जिल्हयात रुग्णांचा मृत्यू दर हा १.६0 इतका असुन रिकव्हरी रेट हा ९५.५५ इतका आहे.
जिल्हयात दुसर्या लाटेचा प्रभाव जवळपास आता ओसरला असुन रुग्ण संख्येमध्ये देखिल मोठया प्रमाणात घट पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे कित्येक दिवसापासुन कोरोनामुळे मृत्यू होणार्या रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ ही आज थांबली असुन केवळ एकाच रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे अमरावतीकरांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.पावसाळा सुरू झाला असुन नागरिकांना सर्दी, खोकला, ताप या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र सर्वांनी आपल्या आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. जिल्हयात अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी शनिवार आणि रविवार मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आल्यामुळे गर्दीला काही प्रमाणात का होईना आळ बसल्याचे दिसुन येत आहे. ९ जुन रोजी जिल्हा आरोग्ययंत्रणेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात १३४ रुग्ण हे कोरोनाबाधित आढळुन आले असुन ९४ हजार ६२४ रुग्ण हे आतापर्यत कोरोनाग्रस्त आसल्याचे आकडेवारीवरून दिसुन येंत आहे.९0 हजार ४१0 रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असला तरी २ हजार ७0२ रुग्ण हे एॅक्टिव्ह आहेत. विशेष म्हणजे एकाच रुग्णाचा मृत्यू झाला असुन जिल्हयात आतापर्यत १ हजार ६८१ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहेत.
जिल्हय़ाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, दिवसभरात १३४ पॉझिटिव्ह
Contents hide