नवी दिल्ली : सगळ्या आजारपणांचे मूळ पोटात आहे, असे आयुर्वेद सांगतो. मिल्खा सिंग यांनी हे तत्त्व अंगीकारले होते. मी लोकांना सांगतो, की अर्धपोटी राहा, असे त्यांनी म्हटले होते.
फिटनेसचे महत्त्व कोणत्याही अँथलीटसाठी अनन्यसाधारण असते. प्रत्येक अँथलीटने त्यासाठी स्वत:ची अशी काही गणित तयार केलेली असतात. त्यासाठीची बंधने ते स्वत:हून काटेकोरपणे पाळतात. मिल्खा सिंगही त्याला अपवाद नव्हते. एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या फिटनेसबद्दल सांगितले होते. फिटनेसमुळेच बदल घडून येऊ शकतो. मी या वयातही जो काही चालू-फिरू शकतो, ते केवळ शारीरिक फिटनेसमुळेच शक्य झाले आहे, असे ते म्हणाले होते. सगळ्या आजारपणांचे मूळ पोटात आहे, असे आयुर्वेद सांगतो. मिल्खासिंग यांनी हे तत्त्व अंगीकारले होते. मी लोकांना सांगतो, की अर्धपोटी राहा. चार पोळ्यांची भूक असेल, तर दोनच पोळ्या खा. पोट जितकं रिकामे राहील, तितके तुम्ही व्यवस्थित राहाल. सगळी आजारपणे पोटातूनच सुरू होतात, असे मी लोकांना कायम सांगायचो, असे मिल्खा सिंग यांनी सांगितले होते.
रोजच्या व्यायामाचे महत्त्वही त्यांनी एका कार्यक्रमात विशद केले होते. आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी दररोज १0 मिनिटे तरी काढणे गरजेचे आहे. बागेत जा किंवा रस्त्यावर जा, पण १0 मिनिटे वेगाने चाला. हाता-पायांच्या हालचाली होतील असे व्यायाम करा. खेळा-बागडा.
शरीरात रक्त सळसळायला हवे, तसे झाले, तर आजारपणही वाहून जातील. मला कधीही डॉक्टरांकडे जावे लागले नाही. तुम्ही हे सगळे पाळलेत, तर तुम्हालाही कधी डॉक्टरकडे जायची वेळ येणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या आरोग्याचे रहस्य लोकांना सांगितले होते. स्टार्स टेलच्या एका कार्यक्रमात मिल्खा सिंग यांनी युवा खेळाडूंसाठी प्रेरक भाषण केले होते. त्यात त्यांनी सांगितले होते, आजच्या काळी खेळाडूंना बराच पैसा मिळतो. खेळाची मैदाने सुसज्ज आहेत, अत्याधुनिक साधने आहेत. पण १९६0 मध्ये मिल्खासिंगने जो विक्रम केला होता, त्या विक्रमाला पुन्हा कोणी गवसणी घालू शकलेले नाही, याची मला खंत आहे. तुमच्याकडे सगळे काही आहे; फक्त तुम्ही पुढे जाण्याची गरज आहे.
१९५८ साली सैन्यात जवान असताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपण पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकले होते, तेव्हा पंडित नेहरूंकडून आपल्याला विचारणा झाली होती, की तुम्हाला काय हवे? त्यावर आपण फक्त एका दिवसाची सुट्टी मागितली होती, अशी आठवणही मिल्खा सिंग यांनी त्या कार्यक्रमात सांगितली होती.
जितकी भूक आहे, त्याच्या अर्धच खा – मिल्खा सिंग
Contents hide