मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला १0 जून रोजी २२ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत आघाडी सरकार आणि इतर मुद्दय़ांवर पक्षाची भूमिका मांडली. आमचा मित्रपक्ष काँग्रेस होता, आहे आणि राहिल. मात्र, आता एक नवीन मित्रपक्ष मिळाला आहे, भविष्यात देखील तीन पक्षाचे सरकार राहावे, असं सांगत २0२४ पर्यंत राष्ट्रवादी पक्ष अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, २२ वर्षांचा काळ हा चढउतारांचा होता. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची नेहमीच महत्त्वाची भूमिका होती. २0२४ पयर्ंत राष्ट्रवादी पक्ष अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील. शरद पवारांचे जुने सहकारी त्यांच्या भागात प्रभावी होते म्हणून त्यांना प्रस्थापित म्हटले गेले. पण यातूनच आर. आर. पाटील यांच्यासारखे नेते पुढे आले. शरद पवारांच्या कामाच्या पद्धतीकडे सर्वच नेते आदराने बघतात. अनेक लोक या पक्षात येण्याची इच्छा बाळगतात, मात्र कोरोनामुळे अडचणी आल्या आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील. कोणत्याही राजकीय पक्षाला मुख्यमंत्रिपदासारखं सर्वोच्च पदाची अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, असं जयंत पाटील म्हणाले. यावेळी २0२४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी तुमच्या पक्षाची महत्वकांक्षा नाही का?, असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले, घरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही. जर पक्ष अधिक चांगला झाला. जनतेने साथ दिली तर त्यावेळी शरद पवार योग्य निर्णय घेतील. आज पहिले काम आहे पक्ष सक्षम करणे. महाराष्ट्रातील नागरिकांना जे प्रश्न भेडसावत आहेत, ते सोडवणे, लोकांचे जीवनमान सुधारणे हे आमच्या पक्षाचे ध्येय आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
जनतेने साथ दिली, तर शरद पवार योग्य निर्णय घेतील -जयंत पाटील
Contents hide