• Sun. May 28th, 2023

छोटी सरदारनीने पूर्ण केले ५00 एपिसोड्स !

मुंबई: कलर्सवरील लोकप्रिय मालिका छोटी सरदारनीमध्ये प्रेम, ड्रामा, अँक्शन आणि अविरत मनोरंजनाचे परिपूर्ण संयोजन आहे. मेहेर (निमरित कौर अहलुवालिया) आणि सरबजी (अविनेश रेखी) यांची प्रेमकथा व दृढ नात्याने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एकमेकांच्या प्रेमात पडण्यापासून दूर होण्यापयर्ंत आणि शेवटी सर्व विषमतांवर मात करत एकत्र येण्यापयर्ंत या जोडीने प्रेमाच्या खर्‍या शक्तीला दाखवले आहे.
या जोडीने लांबचा पल्ला गाठला आहे. प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या नात्याची परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि या जोडप्याने प्रत्येक आव्हानावर प्रबळपणे मात केली आहे. नुकतेच दोघांनी त्यांच्या आवडत्या गोष्टींबाबत सांगितले. आणखी एक साजरीकरणाचे कारण म्हणजे मालिकेने ५00 एपिसोड्सचा टप्पा पूर्ण केला आणि कलाकार व टीमने या खास प्रसंगासाठी तयार केलेले सानुकूल टी-शर्टस परिधान करत हा क्षण साजरा केला.
मालिकेच्या यशाबाबत सांगताना निमरित म्हणाली, मेहेरच्या भूमिकेमुळे मला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम व प्रशंसा मिळाली आहे. यासाठी मी सर्वांचे आभार मानते. मालिकेचे कलाकार व टीम प्रत्येक चढ-उतारादरम्यान अत्यंत सहाय्यक राहिले आहेत आणि आमच्या अथक मेहनतीमुळे सेलिब्रेशन्स व सुवर्ण टप्पे अधिक आनंददायी बनले आहेत. आम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहण्याचे आणि नवीन सुवर्ण टप्पे संपादित करण्याचे वचन देतो. मेहेरव सरबच्या प्रवासाला पुन्हा एकदा रोमांचक वळण मिळणार आहे.
मालिकेच्या यशाबाबत सांगताना अविनेश म्हणाला, हा प्रवास अत्यंत उल्लेखनीय राहिला आहे आणि मी प्रत्येक क्षणाचा भरपूर आनंद घेतला आहे. आम्ही हा नवीन सुवर्ण टप्पा गाठला असताना मी या प्रयत्नामध्ये साह्य केलेल्या सर्वांचे आभार मानतो. मी आमच्यामागे खंबीरपणे उभे राहिलेल्या आणि आमच्या जीवनाचा भाग बनलेल्या मालिकेच्या चाहत्यांचे देखील आभार मानतो. मी सर्व चाहत्यांना इतकेच सांगू इच्छितो की, मालिका छोटी सरदारनीमध्ये पुढे बरेच रोमांचक क्षण पाहायला मिळणार आहेत. तर मग मालिका पाहत राहा आणि तुमच्या आशीवार्दांचा वर्षाव करत राहा. आमचा असे अधिक खास सुवर्ण टप्पे संपादित करण्याचा मनसुबा आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *